Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedसहकार पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यास 18 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

सहकार पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यास 18 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

पुणे, दि. 4: सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना सहकार पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून संस्थांनी 18 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना सन 2023-24 चा पुरस्कार देवून त्यांचा उचित गौरव करण्यासाठी शासनाने सहकार पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. यासाठी यापूर्वी 31 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्यास कळविण्यात आले होते. तथापि, सन 2025 या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये अधिकाधिक सहकारी संस्थांना पुरस्कार मिळण्याकरिता प्रस्ताव सादर करता यावेत यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

इच्छुक सहकारी संस्थांनी सविस्तर प्रस्ताव संबंधित तालुक्याच्या सहायक निबंधक, सहकारी संस्था किंवा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात सादर करावेत.

सहकारी संस्थांनी पुरस्काराच्या अटी, निकष आदी अधिक माहितीसाठी https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच तालुक्याचे सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक अथवा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्ह्याचे अपर निबंधक (पतसंस्था) सहकारी संस्था, श्रीकृष्ण वाडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments