पुणे,31 जुलै 2025 : भारतातील आघाडीच्या ब्युटी ब्रँडसपैकी एक असलेल्या शुगर कॉस्मेटिक्स ने फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम – फॅन पार्क येथे दहाव्या वर्धापन दिनाच्या समारंभासह एक महत्त्वाचा टप्पा गाठला या सोहळ्यामुळे या ठिकाणाचे रंग,आकर्षकता,शैलीच्या चैतन्यशील देखाव्यात रूपांतर झाले. या महत्त्वाच्या कार्यक्रमात सौंदर्य उद्योगात शुगर कॉस्मेटिक्सच्या यशाचा आणि देशभरातील लाखो निष्ठावान ग्राहकांशी दृढ संबंधांचा उत्सव साजरा करण्यात आला.
शुगर कॉस्मेटिक्सचे सहसंस्थापक विनिता सिंग आणि कौशिक मुखर्जी याप्रसंगी उपस्थित होते.त्यांनी शुगर कॉस्मेटिक्सच्या 10 वर्षाच्या अभूतपूर्व प्रवासावर प्रकाश टाकला. या सोहळ्यात अद्ययावत ब्युटी उत्पादनांच्या नवीन श्रेणीचे अनावरण करण्यात आले व याला शहरातील नामवंतांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.त्यानंतर ब्रँडचे यश साजरे करण्यासाठी एक विशेष केक कटींग समारंभ झाला.
फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियमचे केंद्र संचालक विक्रम पै म्हणाले की, शुगर कॉस्मेटिक्सच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन फॅन पार्क येथे होणे ही अत्यंत आनंददायी बाब आहे. फॅन पार्क ही जागा विविध ब्रँडसचे नवोपक्रम आणि ग्राहकांच्या सहभागाने जिवंत होते. हा कार्यक्रम म्हणजे सौंदर्य,उर्जा आणि ग्राहक प्रेमाचे नेत्रदीपक प्रदर्शन होते. यामध्ये ब्रँडचा उत्कृष्ट अनुभव,रोमांचक उत्पादनांचे अनावरण आणि उत्साही संवाद यांचा समावेश होता. फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम येथे आम्ही आघाडीचे ब्रँडस त्यांच्या ग्राहकांशी जोडले जाण्यासाठी आणि खरेदीच्या पलीकडे उत्कृष्ट अनुभवासाठी व्यासपीठ प्रदान करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. ग्राहकांच्या अपेक्षा वाढत असताना,त्याची पूर्तता करण्यासाठी अशा प्रकारचे दिमाखदार सोहळे एक्सक्लुझिव्ह लाँचेस आणि रिटेल क्षेत्रामध्ये भविष्य घडविणारे खास ऑफर्स प्रदान करतो.
ग्राहकांना एक उत्कृष्ट अनुभव प्रदान करण्यासाठी एक्सपिरेंशल बुथ,मिनी मेकओव्हर स्टेशन्स,प्रॉडक्टस सॅम्पलिंग झोन्स,भेटवस्तू आणि ब्रँडिंग मर्कंडाईझ यांचा समावेश होता.
स्टोअर्सच्या पोर्टफोलिओच्या विस्ताराव्यतिरिक्त ग्राहककेंद्रित अनुभव प्रदान करत फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम रिटेल इनोव्हेशन मध्ये अग्रेसर आहे. फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि आवडीनिवडीनुसार त्याची पूर्तता करण्यासाठी आधुनिक मॉल अनुभव पुन:परिभाषित करत शॉपिंग,डायनिंग व लाईफस्टाईल एंगेजमेंट याचा उत्तम मिलाफ असलेला अनुभव प्रदान करतो.


