Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहिंद्रातर्फे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज नवीन CEV-V श्रेणीतील बांधकाम उपकरण सादर

महिंद्रातर्फे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज नवीन CEV-V श्रेणीतील बांधकाम उपकरण सादर

मुंबई, 05 August 2025: महिंद्रा समूहाचा एक भाग असलेल्या महिंद्रा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट डिव्हिजन (MCE) तर्फे आज अत्याधुनिक CEV-V श्रेणीतील यंत्रसामग्रीचे उद्घाटन करण्यात आले. ही यंत्रसामग्री त्यांच्या संबंधित विभागांतील मानके नव्याने परिभाषित करण्यासाठी सज्ज असून प्रगत वैशिष्ट्ये, अधिक आरामदायक कामकाज, जास्त उत्पादकता आणि तसेच उद्योगातील नव्या निकषांचे पालन करत उत्कृष्ट कार्यक्षमता देतात.

या प्रसंगी बोलताना महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा लिमिटेडच्या ट्रक अँड बस अँड कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटचे व्यवसाय प्रमुख डॉ. वेंकट श्रीनिवास म्हणाले, “अत्याधुनिक उत्पादने आणि तंत्रज्ञान सादर करण्यासाठीचे आमचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि जोडीला स्थानिक उत्पादनावर दिलेला भर यातून मेक इन इंडिया उपक्रमाप्रती असलेली महिंद्राची दृढ बांधिलकी अधोरेखित होते. नवीन CEV-V श्रेणीतील बांधकाम उपकरणांच्या सादरीकरणामुळे भारत सरकारच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दिशेने महिंद्राच्या प्रयत्नांना बळकटी मिळत आहे.”
नवीन अपग्रेड करण्यात आलेल्या CEV-V श्रेणीतील महिंद्रा अर्थमास्टर SX बॅकहो लोडर आणि महिंद्रा रोडमास्टर G100 मोटर ग्रेडर यांमध्ये CEV-V उत्सर्जन मानकांची पूर्तता करणारी अधिक शक्तिशाली इंजिन्स आहेत. रोडमास्टर G100 हा उच्च क्षमतेचा मोटर ग्रेडर आगामी CEV-V उत्सर्जन मानकांनुसार तयार करण्यात आला आहे. यामध्ये 102 HP इंजिन आणि 440 Nm टॉर्क असून तो विशेषकरून राज्य व राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामासाठी एक उत्कृष्ट ग्रेडर आहे. नवीन अर्थमास्टर SX देखील CEV-V उत्सर्जन नियमानुसार सुसज्ज आहे. हे 74 HP इंजिन असलेले, नवीन, अधिक मोठे आणि अधिक आरामदायक केबिन असलेले, iMAXX टेलीमॅटिक्स तंत्रज्ञानासह वैशिष्ट्यपूर्ण बॅकहो लोडर आहे. यातून सुधारित कामगिरी आणि कार्यक्षमता सुनिश्चित केली जाते.

नवीन अर्थमास्टर बॅकहो लोडर मध्ये वाढीव टॉर्कसोबतच मोठे, प्रशस्त आणि एर्गोनॉमिक केबिन आहे. ते उत्पादकतेत वाढ करते आणि दीर्घकालीन कामकाजादरम्यान मशीन ऑपरेटरच्या आरामाची खात्री देते. त्याचप्रमाणे नवीन रोडमास्टर मोटर ग्रेडर आपल्या विभागात 22% हून अधिक बाजारपेठीय हिस्स्यासह अग्रगण्य असून रस्ते बांधकाम प्रकल्पांना चालना देण्यासाठी अधिक शक्तिशाली बनवण्यात आला आहे.

जोडीला CEV-V युगात ग्राहकांना अतुलनीय कामगिरी, अपटाईम आणि कार्यक्षमता यांसह वैशिष्ट्यपूर्ण आणि अग्रगण्य हमी देत महिंद्रा अर्थमास्टर बॅकहो लोडर उद्योगातील नवे मापदंड प्रस्थापित करत आहेत:
48 तास अपटाईम गॅरंटी किंवा 1000 रु. प्रती दिवस नुकसान भरपाई
STD मोडमध्ये प्रती लिटर उच्चतम उत्पादकतेची हमी
STD मोडमध्ये उच्चतम इंधन कार्यक्षमतेची हमी

जोडीला, MCE 55HP इंजिनसह महिंद्रा अर्थमास्टर SXe बॅकहो लोडर श्रेणी, तसेच 74HP इंजिनसह महिंद्रा रोडमास्टर G90 आणि G80 ग्रेडर श्रेणी या सध्याच्या यंत्रसामग्रीमधील CEV-V प्रकार चालू ठेवणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments