• मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशन – सर्वात बोल्ड ब्लॅक: बोल्ड डिझाइन एलिमेंट्स आणि स्टायलिज्ड कुरो ब्रँडिंगसह पूर्णपणे ब्लॅक सौंदर्य
• सर्व निसान डीलरशिप आणि निसान अधिकृत वेबसाइटवर फक्त ११,००० रूपयांत बुकिंग सुरू आहे
• नवीन निसान मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशनमध्ये सिग्नेचर ब्लॅक एलईडी हेडलॅम्प्ससह लाईटसेबर टर्न इंडिकेटर, प्रीमियम आय-की वॉक अवे लॉक आणि अॅप्रोच अनलॉक, अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्ट डिस्प्ले, सेबल ब्लॅक वायरलेस चार्जर स्टँडर्ड आणि इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत.
• मेड इन इंडिया न्यू निसान मॅग्नाइट (आरएचडी) जीएनसीएपी ५-स्टार प्रवासी सुरक्षा रेटिंगसह आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेत एकूण सुरक्षिततेच्या बाबतीत विकल्या जाणाऱ्या सर्वात सुरक्षित एसयूव्हीपैकी एक ठरली आहे.
• याशिवाय, निसानने नवीन निसान मॅग्नाइट उत्पादनांमध्ये एक पूर्णपणे नवीन मेटॅलिक ग्रे रंग आणला आहे.
गुरुग्राम, ०६ ऑगस्ट २०२५: निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एनएमआयपीएल) ने आज आपल्या बहुप्रतिक्षित नवीन निसान मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशनची घोषणा केली. ती त्यांच्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्हीची एक आकर्षक आणि प्रीमियम, काळ्या रंगाची थीम असलेली आवृत्ती आहे. कुरो स्पेशल एडिशन ८.३० लाख रूपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होत असून त्यात सर्वाधिक बोल्ड ब्लॅक तत्वज्ञान, सर्वाधिक बोल्ड स्टाइलिंग, सुंदर इंटीरियर ब्लॅक थीम आणि जपानी-प्रेरित डिझाइन संकेतांचे मिश्रण आहे. नवीन निसान मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशन ११,००० रूपयांच्या आकर्षक रकमेत बुकिंगसाठी उपलब्ध आहे. ग्राहक आपली गाडी अधिकृत निसान मोटर इंडिया डीलरशिपद्वारे किंवा अधिकृत निसान मोटर इंडिया वेबसाइट: www.nissan.in ला भेट देऊन बुक करू शकतात.
मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशनचे नाव ‘ब्लॅक’ साठीच्या जपानी शब्दावरून घेतले आहे. त्यातून सुसंस्कृतपणा आणि जपानी डिझाइन अचूकतेची उच्च भावना सिद्ध होतो. ही स्पेशल एडिशन अत्यंत अप्रतिम दिसते. त्यात पूर्णपणे काळ्या रंगाचा बाह्य आणि आंतरभाग आहे आणि ती बाहेरून व आत दोन्ही बाजूंनी एक प्रीमियम, प्रभावी आणि स्टायलिश स्टेटमेंट आहे. ग्राहकांचा अनुभव आणि सुलभता वाढवण्यासाठी, मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशन निसान वेबसाइटवर फोटोरिअलिस्टिक व्हिज्युअल्स, फीचर इंटरॅक्शन्स आणि एंड टू एंड प्रवासासह दृश्यात्मकदृष्ट्या प्रभावी ३डी कॉन्फिगरेटरद्वारे उपलब्ध आहे.
प्रमुख वैशिष्टे:
• मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशन टर्बो-पेट्रोल आणि नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल पॉवरट्रेन पर्यायांसह ऑफर केली जात आहे.
• डाव्या फेंडरवर मॅग्नाइट ब्रँडिंग अंतर्गत एक वेगळा आणि विशेष ‘कुरो’ बॅच
• पियानो ब्लॅक फ्रंट ग्रिल, रेझिन ब्लॅक फ्रंट आणि रियर स्किड प्लेट्स, ग्लॉस ब्लॅक रूफ रेल, बोल्ड आर१६ डायमंड कट अलॉय व्हील्स आणि ब्लॅक डोअर हँडल्स
• मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशनमध्ये सिग्नेचर ब्लॅक एलईडी हेडलॅम्प्स आहेत ज्यात लाइटसेबर टर्न इंडिकेटर मानक म्हणून चांगली दृश्यमानता आणि रस्त्यावरील उपस्थितीसाठी कमांडिंग आहे.
• मिडनाईट थीम डॅशबोर्डसह प्रीमियम आणि डार्क-थीम इंटीरियर, पियानो ब्लॅक फिनिश्ड गियर शिफ्ट गार्निश, पियानो ब्लॅक फिनिश्ड स्टीअरिंग इन्सर्ट, सन व्हिझर्स आणि डोअर ट्रिम्स
• फीचर अपग्रेडमध्ये मानक म्हणून सेबल ब्लॅक वायरलेस चार्जर आणि अॅक्सेसरी म्हणून स्टील्थ डॅश कॅम समाविष्ट आहे.
निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले: “न्यू निसान मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशनमध्ये धाडसी डिझाइन आणि उत्तम कारागिरीचे मूर्त रूप आहे. ती ग्राहकांच्या तीव्र मागणीला प्रतिसाद म्हणून विचारपूर्वक तयार केली गेली आहे आणि एक खास, प्रीमियम आणि वैशिष्ट्यपूर्ण ऑफर आहे. निसान मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशनच्या मागील आवृत्तीला त्याच्या आकर्षक संपूर्ण काळ्या रंगाच्या सौंदर्य आणि अद्वितीय ओळखीसाठी ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला.”
ते पुढे म्हणाले की, “न्यू निसान मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशन मॅग्नाइटच्या एसयूव्हीची उपलब्धता वाढवते आणि निसानच्या अपवादात्मक मूल्य, प्रगत नावीन्य आणि विना तडजोड सुरक्षिततेच्या मुख्य आश्वासनाची पूर्तता करते. अलिकडच्या काळात मिळालेला ५-स्टार जीएनसीएपी हा आमच्या सुरक्षिततेप्रती असलेल्या वचनबद्धतेचा पुरावा आहे आणि आमच्या ‘एक कार, एक जग’ धोरणांतर्गत भारतातून जागतिक दर्जाची उत्पादने पोहोचवतो. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही मॅग्नाइट लाइन-अपमध्ये एक नवीन रंग – मेटॅलिक ग्रे देखील सादर करत आहोत.”
तिचे आकर्षण आणखी मजबूत करत नवीन निसान मॅग्नाइटला अलीकडेच ग्लोबल एनसीएपीकडून ५-स्टार एकूण प्रवासी सुरक्षा रेटिंग देण्यात आले आहे. त्यामुळे ती भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील सर्वात सुरक्षित एसयूव्हींपैकी एक बनली आहे. सर्वात विश्वासार्ह जीएनसीएपी चाचण्यांमध्ये तिने परिपूर्ण ५-स्टार रेटिंग मिळवले. ऑक्टोबर २०२४ मध्ये आलेल्या न्यू निसान मॅग्नाइटमध्ये ४०+ पेक्षा जास्त मानक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. त्यात ६ एअरबॅग्ज, ६७% उच्च तन्य शक्ती स्टील (>४४०Mpa), ६ एअरबॅग्ज, एबीएस+ ईबीडी, ईएससी, टीसीएस, एचएसए, ब्रेक असिस्ट, टीपीएमएस इत्यादींचा समावेश आहे.
मॅग्नाइटच्या यशावर आणि अलिकडच्याच दीएनसीएपी रेटिंगवर आधारित राहून निसान मोटर इंडियाने ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक स्टाइलशी जुळणारा एक नवीन पर्याय ऑफर करणारा एक नवीन मेटॅलिक ग्रे रंगाचा पर्याय देखील सादर केला आहे. हा रंग पर्याय टेकना, टेकना+ आणि एन कनेक्टा प्रकारांमध्ये उपलब्ध असेल.
न्यू निसान मॅग्नाइट एसयूव्हीची बोल्ड आणि स्टायलिश डिझाइन, २०+ प्रथम आणि सर्वोत्तम-इन-सेगमेंट वैशिष्ट्ये आणि ५५+ सुरक्षा वैशिष्ट्ये कॉम्पॅक्ट एसयूव्ही विभागात ती एक उत्कृष्ट निवड बनवतात. न्यू निसान मॅग्नाइट आपल्या रस्त्यावरील बोल्ड उपस्थिती, प्रीमियम वैशिष्ट्ये आणि वाढत्या जागतिक व्याप्तीसह आता ६५ हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे. त्यात उजव्या हाताने ड्राइव्ह आणि डाव्या हाताने ड्राइव्ह दोन्ही बाजारपेठांचा समावेश आहे. न्यू कुरो स्पेशल एडिशन सुधारित स्टाइलिंग आणि वैशिष्ट्यपूर्णता या वारशांवर आणखी भर देते.


