Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorized"आंबेठाण येथे आज शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन.,,* - प्रहारचे बच्चू कडू...

“आंबेठाण येथे आज शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन.,,* – प्रहारचे बच्चू कडू शेतकरी कर्जमुक्तीसह अन्य मागण्यांवर ऊहापोह करणार. – शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार महासंघ संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांची माहिती.

*

*आंबेठाण पुणे,;- *प्रहार संघटना, शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार महासंघ फाउंडेशन व अन्य समविचारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि.७) शेतकरी संघटनेचे संस्थापक स्व. शरद जोशी यांच्या मौजे आंबेठाण-अंगारमळा (ता.राजगुरुनगर) येथील ग्रामपंचायतीसमोरील दक्षिणमुखी मारुती मंदिराशेजारच्या मैदानावर सायंकाळी (४) चार वाजता पहिल्या शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रहारचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमुक्तीसह अन्य मागण्यांवर या परिषदेत ऊहापोह होऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार महासंघ संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी कळविली आहे.*
शेतकर्‍यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रामुख्याने शेतकर्‍यांना संपूर्ण कर्ज मुक्ती मिळाली पाहिजे, सर्व प्रकारच्या शेतमालाला किमान हमीभाव बेस रेट (एम.एस.पी.), गायीच्या दुधाला प्रति लिटरला 48 रुपये व म्हैस दुधाला प्रति लिटरला 58 रुपये असा उत्पादन खर्चाशी निगडित दर मिळावा, सन 2025-2026 च्या ऊस गाळप हंगामासाठी प्रति टनास ऊसाला 4400 रुपये दर मिळावा, कांदा उत्पादक शेतकर्‍यांना किमान प्रति क्विंटलला 2500 रुपये दर मिळावा, दिव्यांगाना पेन्शन व मोफत घरे, 6 हजार रुपये पेन्शन, 55 वय वर्षानंतर शेतकर्‍यांना किमान 10 हजार रुपये पेन्शन, मेंढपाळ, व मच्छीमारांना संरक्षण, बेरोजगार, युवकांना नोकरी आदीसह अन्य मागण्यांचा समावेश आहे. शेतकर्‍यांच्या उसाच्या थकीत एफआरपीवर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 15 टक्के टक्के व्याज भरपाई हंगाम सुरू होण्यापूर्वी मिळावी. अन्यथा 2026-27 चा उस गाळप हंगाम सुरू होऊ दिला जाणार नाही असा इशारा निवेदन द्वारे देण्यात आलेला आहे.
*राज्य सरकारने दोन आक्टोबरचे आत आमच्या मागण्यांवर निर्णय न घेतल्यास शेतकरी प्रहार संघटना परिवार 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्यादिवशी भगतसिंग यांच्या मार्गाने मुंबईत मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा इशाराही बच्चू कडू यांनी शासनास दिल्याचे पवार यांनी कळविले आहे.*

*//पाडेगांव ऊस संशोधनासाठीचा निधी प्रस्तावानुसार मंजूर करावा.*

*महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राला कृषी मंत्री व विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार तत्काळ 40 ते 50 कोटी रुपये मंजूर करुन तेथील व्यवस्था सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला (व्हीएसआय) शेतकर्‍यांकडून गाळप होणार्‍या ऊसावरील प्रति टन एक रुपयांची कपात निम्मी करावी व पाडेगाव ऊस संशोधन केंद्रने आज पर्यंत शंभरहून अधिक व्हरायटी निर्माण केले असून त्यामध्ये उसाचे अधिक रिकवरी देणाऱ्या सर्व व्हरायटी पाडेगाव संशोधन केंद्राने तयार केले असल्यामुळे पाडेगावला निधीची कमतरता पडत आहे, वेळ खायला देण्यात येणारा ऊस कपातीचा निधी निम्मा करून उर्वरित निम्मा निधी पाडेगांव ऊस संशोधन केंद्रास दयावा. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक किसान महामंडळ तसेच दूध उत्पादक महामंडळाची निर्मिती करावी. तसेच इतर शेतकऱ्यांच्या नावाने असणाऱ्या संस्थांमध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नेमणूक करावे तशी मागणी देखील निवेदनात करण्यात आलेली आहे.*
—————————–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments