पुणे – हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेनंतर जीवनशैलीतील काही बदल करणं गरजेचं असतं. परंतु, बऱ्याचदा रूग्ण शस्त्रक्रिया झाली किंवा वेदनामुक्त झाल्यानंतर डॉक्टरांनी सूचवलेले उपाय अंमलात आणत नाहीत. पुन्हा त्रास सुरू झाल्यावर रूग्ण डॉक्टरकडे येतो. त्याचप्रमाणे सध्या मुंबईसह पुण्यात दुसऱ्यांदा हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यासाठी रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया झालेले १० टक्के रूग्णांना पुन्हा रिव्हिजन हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करावी लागत आहे. दर महिन्याला अशा १ ते २ शस्त्रक्रियेसाठी रूग्ण येत असल्याचं तज्ज्ञ डॉक्टर सांगतायेत.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात आलेले खराब इम्प्लांट, युटीआय इन्फेक्शन, ऑस्टिओपोरोसिस, लठ्ठपणा, हाडांची काळजी न घेणें, शस्त्रक्रियेनंतर नियमित फॉलोअँपचा अभाव यामुळे शस्त्रक्रियेनंतरही हिप खराब होऊ लागले आहेत. पुरूषांच्या तुलनेत महिलांची संख्या यात जास्त आहे. लघवीत जळजळ होत असल्यास महिला याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे संसर्ग हाडांपर्यंत पोहचून ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका वाढतो. वेळीच निदान व उपचार न झाल्यास हिप रिप्लेसमेंट शिवाय दुसरा पर्याय नसतो.
पुण्यातील ओएनपी आणि जहांगीर हॉस्पिटलमधील जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. आशिष अरबट म्हणाले की, कोविड महामारीनंतर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांमध्ये वाढ झाली आहे आणि या शस्त्रक्रियांचा उत्तम परिणाम पाहता रुग्णांकडून पसंती मिळत आहे. वयोवृध्दांबरोबरच ३५ ते ४५ वयोगटातील तरुण रुग्णांनाही एव्हीएन किंवा अनुवांशिक कारणांमुळे होणारी हाडांची झीज, जखम आणि नितंबाच्या वेदना होत असल्याचे दिसून येते. यातील अनेक रूग्ण हे दुसऱ्यांदा हिप रिप्लेसमेंटची गरज असणारे आहेत. मुख्यतः शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर काही पथ्य पाळायला सांगतात. पण वेदना जाणवत नसल्याने रूग्ण याकडे दुर्लक्ष करतात. शरीरात बसवलेले इम्प्लांट व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांकडून जाणून तपासणी करून घेणं गरजेचं असतं. परंतु, रूग्ण हे करण्यात टाळाटाळ करतात. पुन्हा त्रास सुरू झाल्यावर डॉक्टरकडे येतात. तोवर उशीर होत असल्याने रूग्णाल हिप रिप्लेसमेंटची गरज भासते.
मागील नऊ महिन्यांपासून असहृय वेदनेनं त्रस्त असणाऱ्या ३४ वर्षीय गणपत भांडवलकर यांच्यावर पुण्यातील ओएनपी रूग्णालयात टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया करताना ३ इंच चिर पाहून नितंबाचा खराब झालेला बॉल काढून टाकण्यात आला आहे. पुण्यातील ओएनपी हॉस्पिटलमधील जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. आशिष अरबट यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. या शस्त्रक्रियामुळे कमी रक्तस्त्राव आणि ऊतीचे नुकसान टाळण्यात मदत मिळाली. या शस्त्रक्रियेनंतर रूग्णाची वेदनेतून मुक्तता झाली आहे.
हिप रिप्लेसमेंट सर्जरी, ज्याला टोटल हिप आर्थ्रोप्लास्टी देखील म्हणतात, हिप जॉइंटचे खराब झालेले भाग कृत्रिम घटकांसह बदलण्याची ही प्रक्रिया आहे. हे सहसा गंभीर ऑस्टियोआर्थरायटिस, संधिवात किंवा इतर आजार असलेल्या लोकांसाठी केले जाते ज्यामुळे हिप जॉइंटचे बरेच नुकसान होते. वेदना कमी करणे, हालचालीमध्ये सुधार आणि रूग्णांला दैनंदिन क्रिया पुर्ववत करता येणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. शस्त्रक्रियेमध्ये खराब झालेले हाडे आणि कूर्चा काढून टाकणे आणि धातू किंवा सिरॅमिक सारख्या मजबूत सामग्रीपासून बनविलेले कृत्रिम भाग घालणे याचा समावेश आहे.
डॉ. आशिष अरबट पुढे म्हणाले की, पारंपारिक पद्धतीच्या उलट या आधुनिक पध्दतीत मागच्या बाजूचे स्नायू आणि नितंबाच्या सांध्याद्वारे चीरा पाडली जाते याला अँटीरियोलॅटरल ऍप्रोच किंवा मॉडिफाइड वॉटसन जोन्स ऍप्रोच असेही म्हणतात. हे समोरुन हिप जॉइंटमध्ये प्रवेश करतात. पारंपारिक शस्त्रक्रियेमध्ये, स्नायूंचे थर कापल्याने बरे होण्याचा कालावधी वाढतो आणि शस्त्रक्रियेनंतर लक्षणीय वेदना होतात. सुधारित वॉटसन जोन्सच्या दृष्टिकोनामुळे कोणतेही स्नायू न कापता कमीत कमी पोस्टऑपरेटिव्ह वेदना आणि जलद पुनर्प्राप्ती शक्य आहे. रुग्णाला पाठीऐवजी नितंबाच्या पुढच्या बाजूला एक लहान चीरा देऊन शस्त्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया हिप जॉइंटच्या सभोवतालची संरचनेवर परिणाम न करता ते निखळण्याचा धोका कमी करते. याव्यतिरिक्त या पध्दतीने केली जाणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचा रुग्णालयातील कालावधी देखील कमी होतो.
शस्त्रक्रियेनंतर झीज भरुन येणे आणि शारीरिक उपचार हे रुग्णांना बरे होण्यास मदत करतात आणि दीर्घकाळासाठी फायदा मिळवून देतात. संसर्ग, इम्प्लांट डिसलोकेशन किंवा शस्त्रक्रियेची गरज यांचा समावेश असू शकतो कारण यामुळे कृत्रिम भाग झिजतात. प्रत्येक रुग्णाच्या परिस्थितीचा काळजीपूर्वक विचार करणे आणि चांगले परिणाम मिळविण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे.
रूग्ण गणपत भांडवलकर म्हणाले की, मागील अनेक महिन्यांपासून मला असहृदय वेदना जाणवत होती. अनेक डॉक्टरांकडून उपचार घेतले परंतु, वेदना कमी होत नव्हती. बरेच महिने आयुर्वेदिक औषध सुरू होते. परंतु काही फरक पडला नाही. परंतु, डॉ. आशिष अरबट यांनी केलेल्या टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेनंतर माझी वेदना दूर झाली आहे. आणि आता मी पुन्हा चालू शकतोय.


