• भारतात बीएसयूव्ही वर्गात** पहिलावहिला १० वर्षांच्या विस्तारित वॉरंटी प्लॅन आणला गेला असून ग्राहकांना ३+७ वर्षांच्या वॉरंटी पर्यायासह विविध प्रकारच्या एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅन्समधून निवड करता येईल.
• एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅनमधून ड्रायव्हिंग आत्मविश्वासाचे संपूर्ण दशक आणि १० वर्षे / २ लाख किमीपर्यंत लागू असलेले संरक्षण प्रति किमी २२ पैसं किंवा १२ रूपये प्रति दिन इतक्या परवडणाऱ्या दरात मिळू शकेल.
• सर्वांगीण संरक्षण सुमारे ७ वर्षांपर्यंत उपलब्ध असून इंजिन आणि ट्रान्समिशन व्याप्ती ८व्या, ९व्या आणि १० व्या वर्षासाठी उपलब्ध होईल.
• फक्त ३ वर्षांच्या मानक वॉरंटी उपलब्ध असलेल्या गाड्यांसाठीच हा १० वर्षे विस्तारित वॉरंटी प्लॅन असून ऑक्टोबर २०२४ मध्ये आलेल्या न्यू निस्सान मॅग्नाइटपासून तो लागू होईल.
• एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅनमध्ये वाढीव लवचिकतेसाठी ग्राहकांच्या गरजांनुसार ३+४, ३+३, ३+२ आणि ३+१ वर्षांचा पर्याय उपलब्ध आहे.
• प्लॅन फक्त न्यू निस्सान मॅग्नाइटसाठीच लागू असेल. ही गाडी भारतातील सर्वाधिक सुरक्षित बी-एसयूव्हीपैकी एक आहे आणि तिने एओपीवर परफेक्ट ५ स्टार रेटिंगसह एकूणच प्रवासी सुरक्षेसाठी जीएनसीएपी ५ स्टार रेटिंग (प्रौढ प्रवासी सुरक्षा) प्राप्त केले आहे.
• एक्स्टेंडेड वॉरंटीला निस्सान फायनान्सच्या माध्यमातून नवीन गाडीच्या खरेदीसोबत सुलभ वित्तपुरवठा उपलब्ध होईल. त्यामुळे ग्राहाकंना खरेदीचा सुलभ आणि सोप्या मालकीचा अनुभव मिळतो.
गुरूग्राम, १२ ऑगस्ट २०२५: निस्सान मोटर इंडियाने आज न्यू निस्सान मॅग्नाइटसाठी एक विशेष असा पहिलाच १० वर्षांचा एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅन आणला आहे. हा सेगमेंटमधील पहिला ग्राहक-केंद्रित उपक्रम आहे जो ब्रँडची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि मनःशांती या दीर्घकालीन वचनबद्धतेला अधोरेखित करतो. नवीन निस्सान मॅग्नाइटला एकूण प्रवासी सुरक्षेसाठी ५-स्टार रेटिंग आणि एओपीसाठी (प्रौढ प्रवासी सुरक्षा) ५-स्टार रेटिंग मिळाल्यानंतर ही योजना जाहीर करण्यात आली.
या प्लॅनमध्ये ३ वर्षांची मानक वॉरंटी देण्यात आली असून ती १० वर्षांच्या एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅनच्या लवचिक प्लॅनद्वारे वाढवता येते. त्यामुळे तुम्हाला फक्त २२ पैसे/किमी किंवा १२ रुपये/दिवस या वाजवी दरात १० वर्षे/२ लाख किमीपर्यंतचा ड्रायव्हिंग आत्मविश्वास आणि संरक्षणाचा संपूर्ण दशकाचा अनुभव मिळतो.
हा १० वर्षांचा एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅन ग्राहकांना अधिक आत्मविश्वास आणि मनःशांती देण्यासाठी आहे. हा निस्सानच्या ग्राहक सेवा वचनाचा एक भाग आहे ज्यात मूल्य, विश्वास आणि निस्सानच्या ग्राहकांच्या शाश्वत भविष्याचे उद्दिष्ट असलेली सेवा समाविष्ट आहे. निस्सानच्या जपानी मूळ, गुणवत्ता मानके, मजबूत विश्वासार्हता आणि उत्तम कलाकृती आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक वचनाला बळकटी देते.
निस्सानच्या १० वर्षांच्या एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅनमुळे ग्राहकांना १० वर्षांपर्यंत संपूर्ण मनःशांती मिळू शकते. व्यापक कव्हरेजमुळे देशभरातील कोणत्याही निस्सान-अधिकृत सेवा कार्यशाळेत कॅशलेस दुरुस्तीची सुविधा मिळेल आणि दाव्यांची संख्या किंवा मूल्य यावर कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे अनपेक्षित दुरुस्ती खर्चात बचत होते आणि खरे निस्सान स्पेअर पार्ट्स वापरून उच्च-गुणवत्तेच्या सेवेची हमी मिळते. याशिवाय विस्तारित वॉरंटी योजनेसाठी निस्सान फायनान्सकडून नवीन वाहन खरेदीसोबत सहजपणे वित्तपुरवठा केला जाऊ शकतो आणि त्यामुळे ग्राहकांना अखंड आणि सुलभ मालकी अनुभव मिळतो.
निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले: “न्यू निस्सान मॅग्नाइट ही भारतीय ग्राहकांसाठी गुणवत्ता, विश्वासार्हता, सुरक्षितता आणि दीर्घकालीन मूल्याचे प्रतीक आहे. तिला ग्लोबल एनसीएपीकडून ५-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले असून ती भारतातील सर्वात सुरक्षित बी-एसयूव्हींपैकी एक बनली आहे हे पाहून आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या १० वर्षांच्या एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅनसह आम्ही फक्त एक वचन नाही तर आम्ही ग्राहकांना दशकभरासाठी चिंतामुक्त मालकीचा अनुभव देत आहोत. हा उपक्रम ग्राहकांना निस्सानच्या सिद्ध गुणवत्ता, अभियांत्रिकी आणि सेवा उत्कृष्टतेच्या आधारावर तडजोड न करता त्यांच्या न्यू निस्सान मॅग्नाइटचा आनंद घेण्याचे स्वातंत्र्य देतो. आम्हाला आमच्या ग्राहकांनी न्यू निस्सान मॅग्नाइटसह संस्मरणीय प्रवास अनुभव घ्यावेत अशी आमची इच्छा आहे. काळजीचे विषय आम्ही सांभाळू.”
न्यू निस्सान मॅग्नाइटचे तिचे आकर्षण आणखी बळकट करताना अलीकडेच ग्लोबल एनसीएपीकडून ५-स्टार ओव्हरऑल पॅसेंजर सेफ्टी रेटिंग देण्यात आले आहे. त्यामुळे ती भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील सर्वात सुरक्षित एसयूव्हींपैकी एक ठरली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये आलेली न्यू निस्सान मॅग्नाइट सुधारित सीएमएफ-ए+ प्लॅटफॉर्मवर बनवली गेली असून त्यात ४०+ पेक्षा जास्त मानक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. त्यात ६ एअरबॅग्ज, सुधारित बॉडी रचना असून ६७% उच्च तन्य शक्ती स्टील (>४४० एमपीए), एबीएस+ इबीडी, इएससी, टीसीएस, एचएसएस, ब्रेक असिस्ट, टीपीएमएस इत्यादींचा समावेश आहे.
निस्सान मोटर इंडियाने अलीकडेच आपली बहुप्रतिक्षित नवीन निस्सान मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशन बाजारात आणली. ती त्यांच्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्हीची एक आकर्षक आणि प्रीमियम, काळ्या थीम असलेली आवृत्ती आहे. कुरो स्पेशल एडिशन 8.30 लाख रूपये (एक्स-शोरूम, दिल्ली) किमतीपासून सुरू होत असून ती बोल्डेस्ट ब्लॅक तत्वज्ञानाचे प्रतीक आहे. त्यात बोल्ड स्टाइल, एक माइल्ड इंटीरियर ब्लॅक थीम आणि जपानकडून डिझाइनचे मिश्रण आहे.
न्यू निस्सान मॅग्नाइट एसयूव्हीची बोल्ड आणि स्टायलिश डिझाइन आणि रस्त्यावरील उपस्थिती, २० हून अधिक प्रथम आणि सर्वोत्तम श्रेणीतील वैशिष्ट्ये आणि ५५+ सुरक्षा वैशिष्ट्ये यामुळे ती कॉम्पॅक्ट एसयूव्ही विभागात एक वेगळी निवड ठरली आहे. आपल्या बोल्ड रोड उपस्थिती, उत्तम वैशिष्ट्ये आणि वाढत्या जागतिक व्याप्तीसह न्यू निस्सान मॅग्नाइट आता ६५ हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे. त्यात उजव्या हाताने ड्राइव्ह आणि डाव्या हाताने ड्राइव्ह दोन्ही बाजारपेठांचा समावेश आहे.
१० वर्षांच्या एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅनचे तपशील
एक्स्टेंडेड वॉरंटी कव्हरेज: निस्सान एक्सटेंडेड वॉरंटी प्लॅन हा एक सशुल्क उपक्रम आहे. तो ग्राहकांना त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार कव्हर पर्याय निवडण्याची लवचिकता देतो. मानक वॉरंटीत ३ वर्षे / १ लाख किमी व्याप्त होतात तर विस्तारित वॉरंटी १० वर्षे / २ लाख किमी पर्यंत संरक्षण देते.
ग्राहकांना ३+४, ३+३, ३+२, किंवा ३+१ अशा विविध पर्यायांमधूनही लवचिक वॉरंटी निवडता येईल. जेणेकरून त्यांना त्यांच्या वाहनासोबत दीर्घकालीन मानसिक शांती आणि सुरक्षितता मिळेल. शोरूममधून थेट नवीन वाहन खरेदी करताना विस्तारित वॉरंटी योजना खरेदी करता येते.
ही योजना मूळ निस्सान नवीन वाहन वॉरंटीद्वारे देण्यात येणाऱ्या संरक्षणाच्या तुलनेत सुटे भाग, दुरुस्ती आणि संबंधित खर्चासाठी व्यापक कव्हर प्रदान करते. त्यामुळे तुमचे वाहन पुढील अनेक वर्षे सुरक्षित राहील याची खात्री होते.
पात्रता आणि अटी: १० वर्षांचा एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅन फक्त खाजगी मालकीच्या नवीन निस्सान मॅग्नाइट वाहनांसाठी खालील अटी आणि शर्तींवर उपलब्ध आहे:
• ग्राहकांना ३+७, ३+४, ३+३, ३+२ आणि ३+१ वर्षे अशा विविध पर्यायांसह विविध प्रकारचे एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅन निवडता येतील.
• न्यू निस्सान मॅग्नाइटपासून सुरू होणारा १० वर्षांचा एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅन फक्त ३ वर्षांच्या मानक वॉरंटी असलेल्या वाहनांसाठी उपलब्ध आहे.
• मानक वॉरंटी कालावधीतील कोणत्याही नवीन निस्सान मॅग्नाइट ग्राहकाने यापूर्वी एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅनचा पर्याय निवडला नसल्यास तो १० वर्षांचा एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅन खरेदी करू शकतो.
• ऑक्टोबर २०२४ पूर्वी २ वर्षांच्या मानक वॉरंटीसह विकल्या गेलेल्या निस्सान मॅग्नाइटच्या मागील आवृत्तीसाठी १० वर्षांचा एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅन उपलब्ध नसेल.
• प्लॅन खरेदी करताना न्यू निस्सान मॅग्नाइट वाहने मानक वॉरंटी कव्हरेजमध्ये असणे आवश्यक आहे, इतर कोणतेही पात्रता निकष नाहीत.
• मानक वॉरंटीनंतर एक्स्टेंडेड वॉरंटी कव्हरेज 7 वर्षांपर्यंत वाढते. त्यातून अटी आणि शर्तींनुसार सर्व यांत्रिक आणि विद्युत बिघाड किंवा दोषांपासून संरक्षण मिळते.
• एक्सटेंडेड वॉरंटी प्लॅन ८ व्या, ९ व्या आणि १० व्या वर्षांसाठी इंजिन आणि ट्रान्समिशन कव्हरेज देतो. त्यामुळे ग्राहकांना दीर्घकालीन मानसिक शांती मिळते.
• ग्राहकांना मानक ओईएम वॉरंटी संपण्यापूर्वी वाहनाच्या सामान्य आयुष्यमानादरम्यान कोणत्याही अधिकृत डीलरकडून ते खरेदी करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे.
• मानक ओईएम वॉरंटी संपल्यानंतर एक्स्टेंडेड वॉरंटीअंतर्गत कव्हरेज लगेच सुरू होईल.
• १० वर्षांच्या विस्तारित वॉरंटी योजनेतील सर्व खरेदी केवळ अधिकृत निस्सान डीलर्सद्वारेच केल्या जातील.
* * बी-एसयूव्ही – ४ मीटर लांबीपेक्षा कमी लांबीची एसयूव्ही


