Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतातील जीवन विमा कंपन्यांनी विक्रमी नवीन व्यवसाय आकडेवारीची नोंद केली; वायटीडी आधारावर...

भारतातील जीवन विमा कंपन्यांनी विक्रमी नवीन व्यवसाय आकडेवारीची नोंद केली; वायटीडी आधारावर प्रीमियम संकलनात ९.०१ टक्‍के वाढ

मुंबई, १२ ऑगस्ट २०२५: लाइफ इन्‍शुरन्‍स कौन्सिलने जुलै २०२५ महिन्यासाठी अद्ययावत उद्योग व्यवसाय आकडेवारी जाहीर केली आहे. अनेक प्रमुख वैशिष्ट्यांमध्‍ये भारतातील जीवन विमा कंपन्यांनी जुलै २०२५ महिन्यात अंडरराइट केलेल्या नवीन व्यवसाय प्रीमियम्स (एनबीपी)मध्ये वार्षिक २२.४२ टक्‍क्‍यांची उत्तम वाढ दर्शवली आहे, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत वायटीडी आकडेवारीत ९.०१ टक्‍के वाढीची नोंद केली आहे.

नवीन व्यवसाय प्रीमियम्‍स जुलै २०२४ मधील ३१८२२.६९ कोटी रूपयांवरून जुलै २०२५ मध्ये ३८९५८.०५ कोटी रूपयांपर्यंत वाढले, या महिन्यात वायटीडी संकलन १२१५४९.३९ कोटी रूपयांवरून १३२५०२.६३ कोटी रूपयांपर्यंत वाढले.

लाइफ इन्‍शुरन्‍स कौन्सिलने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जीवन विमा उद्योगात जुलै २०२५ मध्ये वार्षिक आधारावर वैयक्तिक सिंगल प्रीमियम्‍स १९.४४ टक्‍क्‍यांनी वाढून ५,५०६.८१ कोटी रूपयांपर्यंत पोहोचले, तर वायटीडी वाढ १४.०९ टक्‍के होती. वैयक्तिक नॉन-सिंगल प्रीमियम्‍स जुलै २०२५ मध्ये ९.६० टक्‍क्‍यांनी वाढून १०,०५१.०५ कोटी रूपयांपर्यंत पोहोचले, वायटीडी संकलन गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्‍या तुलनेत ६.०२ टक्‍के जास्त झाले.

जीवन विमा कंपन्या प्रथमच जीवन विमा खरेदीदारांना आवश्यक जीवन विमा उपाय खरेदी करण्यास प्रेरित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत, ज्यामुळे जुलै २०२५ मध्ये एकत्रित वैयक्तिक प्रीमियम संकलनात १२.८९ टक्‍के वाढ आणि वायटीडी आधारावर ८.६५ टक्‍के वाढ झाली आहे.

ग्रुप पॉलिसी विभागात सिंगल प्रीमियम्‍समध्ये २९.४८ टक्‍के वाढ झाली असून मासिक संकलन २१,२८०.५३ कोटी रूपये झाले. जुलै २०२५ मध्ये ग्रुप पॉलिसी श्रेणीमधील प्रीमियम्‍स संकलनात २९.७० टक्‍के वाढ झाली.

भारतातील जीवन विमा उद्योग विम्याची उपलब्धता वाढवून आणि पूर्वीची वंचित क्षेत्रे व व्‍यक्‍तींच्‍या विभागांपर्यंत पोहोचून लक्षणीय प्रगती करत आहे. जीवन विमा कंपन्यांनी ३,४७,५६१ हून अधिक वैयक्तिक जीवन विमा एजंट जोडले आहेत, ज्यामध्ये एकूण एजंट संख्येत २.२७ टक्‍के वाढ झाली आहे. एजंट जोडणीची ही सातत्यपूर्ण गती जीवन विमा कंपन्यांच्या डिजिटायझेशनच्या उच्‍च गतीशी पूरक आहे, ज्यामुळे विम्‍यामधून अतिरिक्‍त नफा मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, जो आर्थिक वर्ष २५ आणि त्यानंतर नवीन व्यवसाय प्रीमियम्‍सना अधिक चालना देईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments