Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्वातंत्र्यदिनाचा 78 वा वर्धापन दिन समारंभ 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनाचा 78 वा वर्धापन दिन समारंभ 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण

पुणे, दि.12: भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 78 वा वर्धापन दिन शुक्रवार दि. 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे सकाळी 9.05 वा. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 7.30 वाजता आणि शनिवार वाडा येथे सकाळी 8 वा. ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर तसेच ऐतिहासिक महत्वाच्या गड किल्ल्यांवर राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात गडकिल्ले शनिवारवाडा सोबतच विविध ठिकाणी ध्वजारोहण समारंभाचे आयोजन

जिल्ह्यात तहसीलदार हवेली, जुन्नर, पुरंदर, वेल्हे, भोर, मावळ कार्यालयाच्यायांच्यावतीने आपआपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या तोरणा, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, तिकोणा, लोहगड ऐतिहासिक किल्ले, शनिवारवाडा सोबतच विविध ठिकाणी ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments