Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्रीजी शिपिंग ग्लोबल लिमिटेडचा आयपीओ मंगळवारी, 19 ऑगस्ट 2025 रोजी उघडणार

श्रीजी शिपिंग ग्लोबल लिमिटेडचा आयपीओ मंगळवारी, 19 ऑगस्ट 2025 रोजी उघडणार

किंमत पट्टा प्रति इक्विटी शेअर ₹240 ते ₹252 (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹10) असा निश्चित करण्यात आला आहे.
फ्लोअर प्राइस हा इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 24 पट आहे आणि कॅप प्राइस हा दर्शनी मूल्याच्या 25.2 पट आहे.
बिड/इश्यू मंगळवार, 19 ऑगस्ट 2025 रोजी उघडेल आणि गुरुवार, 21 ऑगस्ट 2025 रोजी बंद होईल. अँकर इन्व्हेस्टर्ससाठी बिडिंग डेटा सोमवार, 18 ऑगस्ट 2025 रोजी बंद होईल;
किमान 58 इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर 58 इक्विटी शेअर्सच्या पटीत बिड करता येईल.
आरएचपी लिक : https://beelinemb.com/wp-content/uploads/2025/08/Shreeji-Shipping-Global-Limited_RHP.pdf

मुंबई, 11 ऑगस्ट 2025 : श्रीजी शिपिंग ग्लोबल लिमिटेड (SSGL) यांनी जाहीर केले की, त्यांच्या प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावाच्या (IPO) इक्विटी शेअर्ससाठी बिड/इश्यू मंगळवार, 19 ऑगस्ट 2025 रोजी उघडेल. हा बिड/इश्यू गुरुवार, 21 ऑगस्ट 2025 रोजी बंद होईल.
अँकर इन्व्हेस्टर्ससाठी बिडिंगची तारीख सोमवार, 18 ऑगस्ट 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे.
किमान 58 इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर 58 इक्विटी शेअर्सच्या पटीत बिड करता येईल. (“बिड तपशील”)
या इश्यूचा किंमत पट्टा प्रति इक्विटी शेअर ₹240 ते ₹252 असा निश्चित करण्यात आला आहे. (“इश्यू किंमत”)
एकूण इश्यू आकारामध्ये 100% फ्रेश इश्यूचा समावेश असून, त्यात प्रत्येकी ₹10 दर्शनी मूल्य असलेले एकूण 16,298,000 इक्विटी शेअर्स असतील (“फ्रेश इश्यू”). कंपनीला फ्रेश इश्यूतून मिळणाऱ्या निव्वळ रकमेचा वापर जहाजांची खरेदी (सेकंडरी मार्केटमधून सुप्रामॅक्स श्रेणीतील ड्राय बल्क कॅरिअर्स) यासाठी अंदाजे ₹2,511.79 मिलियन [₹251.18 कोटी], कंपनीने घेतलेल्या काही बकाया कर्जाची अंशतः किंवा पूर्णपणे आगाऊ फेड/परतफेड करण्यासाठी अंदाजे ₹230 मिलियन [₹23 कोटी] आणि उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी करण्यात येणार आहे (“द ऑब्जेक्ट ऑफ द इश्यू”). भारतामध्ये किंवा जागतिक पातळीवर, कंपनीसारखा व्यवसाय करणाऱ्या आणि तुलनात्मक आकाराच्या कोणत्याही सूचिबद्ध कंपन्या (पीअर ग्रुप कंपन्या) उपलब्ध नाहीत.
कंपनी भारत आणि श्रीलंकेतील विविध बंदरे व जेटीज येथे ड्राय बल्क कार्गोसाठी शिपिंग आणि लॉजिस्टिक सोल्युशन्स पुरवते. 31 मार्च 2025 पर्यंत कंपनीकडे 80 हून अधिक जहाजांचा ताफा असून, बर्जेस, मिनी बल्क कॅरिअर्स, टग बोटी आणि फ्लोटिंग क्रेन्स यांचा समावेश आहे. याशिवाय कंपनीकडे 370 पेक्षा जास्त अर्थमूव्हिंग उपकरणे आहेत. कंपनीने स्वतःचा विकास एकात्मिक शिपिंग आणि लॉजिस्टिक सोल्युशन्स प्रदाता म्हणून केला असून, ती मुख्यत्वे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील नॉन-मेजर बंदरे व जेटीजवर लक्ष केंद्रित करते. आतापर्यंत तिने कांडला, नवलखी, मगतल्ला, भावनगर, बेदी, धरमतार, तसेच श्रीलंकेतील पुत्तलम बंदरासह 20 हून अधिक बंदरांना सेवा दिली आहे. उद्योगातील अनुभव आणि व्यापक वाहतूक नेटवर्कच्या जोरावर कंपनी तेल व वायू, ऊर्जा व वीज, एफएमसीजी, कोळसा आणि धातू या क्षेत्रांना सेवा पुरवते. एंड-टू-एंड, सिंगल-विंडो सेवा देऊन ती ग्राहकांना सोय उपलब्ध करून देते, तसेच महसूल वाढीस हातभार लावते.
कंपनीची ग्राहक श्रेणी अत्यंत वैविध्यपूर्ण असून, यात सीलोन शिपिंग कॉर्पोरेशन लिमिटेड, अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड, टॉरेंट पॉवर लिमिटेड, टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, आरएसपीएल लिमिटेड, श्री दिग्विजय सीमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, अल्ट्राटेक सीमेंट लिमिटेड, अंबुजा सीमेंट्स लिमिटेड, एसीसी लिमिटेड, अगरवाल कोल कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, तरणजोत रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड, मोहित मिनरल्स लिमिटेड, बालाजी माल्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, एफ.सी. अगरवाल कोल प्रायव्हेट लिमिटेड, ग्रीन गोल्ड ग्लोबल रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड, ए. टी. ट्रेड ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड, पी.आर.एच. रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड, ग्लोबल लॉजिस्टिक्स आणि आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीने ऑपरेशन्समधून ₹6,076.13 मिलियन महसूल, ₹2,006.82 मिलियन EBITDA आणि करानंतर ₹1,412.37 मिलियन नफा कमावला आहे.
कंपनीला श्यामा प्रसाद मुखर्जी बंदर, कोलकाता अंतर्गत डायमंड हार्बर आणि इतर खोलवर डाफ्ट असलेल्या ठिकाणी मालवाहतूक आणि कंटेनर लाइटनिंग/टॉपिंग-अपसाठी फ्लोटिंग क्रेन सुविधा उभारण्याचा १५ वर्षांच्या कालावधीसाठी लेटर ऑफ इंटेंट (LOI) मिळालेले आहे. याशिवाय, कंपनी कोळसा खाण व्यवसायात भागीदारांच्या कन्सोर्टियमसह प्रवेश करण्याची योजना आखत असून, या अंतर्गत ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडकडून २५ वर्षांच्या करार कालावधीसाठी ₹80,307.88 मिलियन (GST वगळता) मूल्याच्या ऑर्डर प्राप्त केल्या आहेत.
कंपनी भारतातील एकात्मिक शिपिंग आणि लॉजिस्टिक्स सेवा क्षेत्रातील एक प्रमुख खेळाडू असून, विविध महत्त्वाच्या उद्योग क्षेत्रांतील संस्थात्मक ग्राहकांशी दीर्घकालीन संबंध ठेवते. ड्राय बल्क विभागात कंपनीने मालवाहतूक हाताळणीचे ऑपरेशन्स स्थापन केले असून, तिच्याकडे स्वतःच्या जहाजांच्या ताफ्याच्या आधारावर कार्यक्षम ऑपरेशनल क्षमता आहे. ऑपरेशनल कार्यक्षमता आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनामुळे कंपनीने आर्थिक कामगिरीत सातत्याने वाढ दर्शविली आहे. कंपनीचे व्यवसाय अनुभवी प्रमोटरनी नेतृत्व केलेले असून, समर्पित व्यवस्थापन टीमने त्याला पाठिंबा दिला आहे.
कंपनीची धोरणे खर्चांचे कार्यक्षम नियोजन, ऑपरेशनल कार्यक्षमता वाढविणे आणि तिच्या जहाजे व उपकरणांमध्ये गुंतवणूक करून क्षमता मजबूत करण्यावर केंद्रित आहेत. कंपनीची योजना जमिनीपासून बंदरापर्यंत आपले ऑपरेशन्स विस्तारित करण्याची, उद्योगातील संधींचा लाभ घेण्याची आणि नवीन ग्राहक मिळवून, तसेच नवीन क्षेत्रांत प्रवेश करून तिचा महसूल स्रोत विविधतापूर्ण करण्याची आहे.
कंपनीच्या 05 August 2025 रोजी रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (ROC), अहमदाबाद, गुजरात यांच्याकडे नोंदलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे ऑफर करण्यात आलेले इक्विटी शेअर्स राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (BSE) या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर सूचिबद्ध होण्याचा प्रस्ताव आहे. या इश्यूसाठी, डिझिग्नेटेड स्टॉक एक्सचेंज म्हणून BSE लिमिटेड निवडण्यात आले आहे.
हा इश्यू एससीआरआरच्या नियम 19(2)(b) च्या संदर्भात, सेबी आयसीडीआर नियमांच्या नियम 31 सह वाचल्यानुसार करण्यात येत आहे. हा इश्यू सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या नियम 6(1) नुसार बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे जारी केला जात आहे, ज्यामध्ये एकूण इश्यूच्या जास्तीतजास्त 50% भागाचा वाटप योग्य पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल बायर्स – “QIBs”) प्रमाणानुसार होणार आहे (“क्यूआयबी पोर्शन”), तसेच कंपनी बीआरएलएम्ससह सल्लामसलत करून क्यूआयबी पोर्शनचा 60% पर्यंत हिस्सा अँकर इन्व्हेस्टर्सना योग्य पद्धतीने वाटप करू शकते (“अँकर इन्व्हेस्टर पोर्सन”), ज्यापैकी एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी राखीव ठेवला जाईल, परंतु तो फक्त त्यावेळी लागू आहे, जेव्हा देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून अँकर इन्व्हेस्टर्सना करण्यात आलेल्या वाटपाच्या किमतीवर (“अँकर इन्व्हेस्टर अलोकेशन प्राइस”) किंवा त्याहून अधिक किमतीवर वैध बिड्स प्राप्त होतील, असे सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार केले जाईल.
जर अंडर-सबस्क्रिप्शन झाले किंवा अँकर इन्व्हेस्टर भागात वाटप झाले नाही, तर उरलेल्या इक्विटी शेअर्सना नेट QIB भागात समाविष्ट केले जाईल. याशिवाय, नेट QIB भागाच्या 5% वाटा फक्त म्युच्युअल फंडांसाठी प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध असेल आणि उर्वरित नेट QIB भाग सर्व QIB बोलीदारांसह (म्युच्युअल फंडांसह) प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध असेल, त्यासाठी वैध बिड्स इश्यू किमतीवर किंवा त्याहून अधिक किमतीवर प्राप्त होणे आवश्यक आहे. मात्र, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी नेट QIB भागाच्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात उपलब्ध असलेले उरलेले इक्विटी शेअर्स नेट QIB भागात समाविष्ट करून सर्व QIB बोलीदारांमध्ये प्रमाणानुसार वाटप केले जाईल.
याशिवाय, एकूण इश्यूचा किमान 15% हिस्सा नॉन-इंस्टिट्युशनल बोलीदारांसाठी (“नॉन-इंस्टिट्युशनल भाग”) प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध असेल, ज्यापैकी (a) नॉन-इंस्टिट्युशनल भागाचा एक तृतीयांश हिस्सा ₹0.20 मिलियन ते ₹1 मिलियन दरम्यानच्या अर्ज आकाराचे बोलीदारांसाठी राखीव असेल आणि (b) नॉन-इंस्टिट्युशनल भागाचा दोन-तृतीयांश हिस्सा ₹1 मिलियनपेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या बोलीदारांसाठी राखीव असेल. जर या दोन उपविभागांपैकी कुठल्याही उपविभागात अंडर-सबस्क्रिप्शन झाले, तर तो उरलेला हिस्सा दुसऱ्या उपविभागातील बोलीदारांना वाटप केला जाऊ शकतो, तसेच एकूण इश्यूचा किमान 35% हिस्सा SEBI ICDR नियमांनुसार रिटेल इंडिव्हिज्युअल बोलीदारांसाठी वाटपासाठी राखीव असेल, त्यासाठी त्यांच्याकडून वैध बिड्स इश्यू किमतीवर किंवा त्याहून अधिक किमतीवर प्राप्त होणे आवश्यक आहे.
सर्व संभाव्य बोलीदारांना (अँकर इन्व्हेस्टर्स वगळता) अनिवार्यपणे अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट (“ASBA”) प्रक्रियेच्या माध्यमातून इश्यूमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना त्यांच्या संबंधित ASBA खात्यांचे तपशील आणि UPI यंत्रणेचा वापर करणाऱ्या यूपीआय बोलीदारांच्या बाबतीत यूपीआय आयडी प्रदान करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेंतर्गत संबंधित बोली रकमेपर्यंत त्यांची रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स (“SCSBs”) किंवा यूपीआय यंत्रणेंतर्गत प्रायोजक बँकेद्वारे ब्लॉक केली जाईल. अँकर इन्व्हेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेच्या माध्यमातून इश्यूमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक माहितीसाठी, कृपया पृष्ठ 399 वरील “इश्यू प्रोस्युजर” पाहा.
बीलाइन कॅपिटल अ‍ॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एलारा कॅपिटल (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
इथे वापरलेली सर्व मोठ्या अक्षरांतील संज्ञा ज्या प्रकारे आरएचपीमध्ये व्याख्यायित नाहीत, त्यांना आरएचपीमध्ये दिलेलाच अर्थ लागू होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments