Tuesday, September 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedमदर्स रेसिपीतर्फे त्यांच्या सॉस उत्पादन श्रेणीसाठी किफायतशीर स्मॉल स्पाऊट पॅक सादर

मदर्स रेसिपीतर्फे त्यांच्या सॉस उत्पादन श्रेणीसाठी किफायतशीर स्मॉल स्पाऊट पॅक सादर

पुणे, फेब्रुवारी 16, 2023 – मदर्स रेसिपी, हा भारताचा अग्रगण्य ब्रॅंड असून त्यांच्या वतीने रेड चिली, ग्रीन चिली, गार्लिक चिली आणि सोयाबीन अशा चार आकर्षक चवींमध्ये त्यांच्या रेसिपी ग्लोबल एक्झॉटीक सॉस रेंजच्या लहान आकारातील स्पाऊट पॅक लॉन्चची घोषणा मुंबई तसेच पुणे येथे करण्यात आली आहे. रु. 25 किंमतीचे 85 ग्रॅम स्पाऊट पॅकिंग केवळ खिशाला पडवडणारे नसून साठवणूक तसेच वापराच्या दृष्टीनेही सुलभ आहे.

रेसिपी’चे परदेशी चवीचे अस्सल ग्लोबल सॉस अन्नपदार्थांना छान चव देतात. त्यामुळे घरच्या घरी इंडो-चायनीज पदार्थ सोप्या पद्धतीने तयार करता येतात. ज्यामुळे ही रेसिपी अनोखी बनते, या सॉसमध्ये कोणतेही कृत्रिम रंग वापरले जात नाहीत. हा रेसिपी ब्रॅंड तुम्हाला काहीतरी स्पेशल देऊन जातो: तुम्हाला अनेक पद्धतीने स्वयंपाक करण्याचा पर्याय उपलब्ध होतो. अस्सल आणि नेमक्या चवीची खात्री राहते. तसेच खिशाला परवडणाऱ्या किंमतीत परदेशी पदार्थांची चवही घेता येते. फ्राईड राईस, चाओमीन आणि पनीर चिली अशा तोंडाला पाणी आणणाऱ्या चायनीज डिशकरिता हे सॉस अगदीच साजेसे आहेत.

या लॉन्चविषयी बोलताना मदर्स रेसिपी’च्या एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर संजना देसाई म्हणाल्या, “आधुनिक, वेगवान युगात, गुणवत्तेचा त्याग न करता सुविधा देण्याचे महत्त्व आपण जाणतो. आमच्या ग्राहकांच्या पसंतीनुसार, कोणत्याही कृत्रिम रंगांशिवाय चटण्या तयार केल्या जातात. ग्राहकांना समाधानकारक अनुभव मिळवून देण्यासाठी, सोयीस्कर आणि पोर्टेबल पॅकेजिंगमध्ये आवडत्या चवी वितरित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

ही उत्पादन श्रेणी आता मुंबई तसेच पुणे येथील तुमच्या नजिकच्या दुकानांत आणि रिलायन्स फ्रेश, डी-मार्ट तसेच बिगबास्केटसारख्या अग्रगण्य सुपरमार्केट चेनमध्ये 85 ग्रॅम केवळ रु. 25 ला उपलब्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments