Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedएमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलसचिव गणेश पोकळे यांची प्रतिक्रिया :

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलसचिव गणेश पोकळे यांची प्रतिक्रिया :

शुक्रवारी पत्रकार संघात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रशासना विरोधात निलंबित कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातीली महिलांनी पत्रकार परिषद आयोजित करून विद्यापीठाला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. वरील सर्व कर्मचार्‍यांच्या संबंधातिल प्रकरण न्यायालयात प्रविष्ट आहे. अशा वेळेस न्यायालयाचा जो निर्णय असेल तो विद्यापीठ प्रशासनाला मान्य असेल.
त्याच प्रमाणे या कर्मचार्‍यांच्या महिलांनी काही लावलेले आरोप खोटे आहेत. विद्यापीठातील प्रशासनाला भेटायला आल्यावर त्यांना कोंडून ठेवण्यात आलेले नव्हते. तसेच त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आलेली नव्हती. या संबंधातिल कोणत्याही प्रकरणात पोलिसांना कधिही बोलविण्यात आलेले नाही.
निलंबित कर्मचार्‍यांनी केलेल्या कार्याबद्दल कार्रवाई झालेली आहे. संस्थेने कधिही त्यांच्यावर अन्याय केलेला नाही आणि या पुढे ही कधिही होऊ देणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments