Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedकार्तिक केदार निवाते याची स्केटिंग स्टेट लेवल साठी निवड

कार्तिक केदार निवाते याची स्केटिंग स्टेट लेवल साठी निवड

पिंपरी, पुणे (दि. १७ फेब्रुवारी २०२४) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील कार्तिक केदार निवाते याची स्केटिंग असोसिएशन पुणे मधून अंडर ११ मध्ये २०२४ स्टेट लेवल साठी निवड झाली आहे. कार्तिक निवाते हा तिसरीचा विद्यार्थी आहे. त्याने नियमित अभ्यास करून रोज तीन तास स्केटिंगचा सराव करून हे यश मिळवले आहे. अंडर – ११ रोलर स्केटिंग चॅम्पियन शिप स्पर्धा मुंबई विरार येथे होणार आहे.
प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, क्रीडा शिक्षक चंद्रकांत ठोंबरे, संदीप घाडगे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी कार्तिकचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
———————————–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments