Wednesday, September 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात प्रथमच आयएसपीआरएस जीआयएफटीएस शिखर संमेलन 2025 – भूस्थानिक नवकल्पना व...

पुण्यात प्रथमच आयएसपीआरएस जीआयएफटीएस शिखर संमेलन 2025 – भूस्थानिक नवकल्पना व शाश्वततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर

मुख्य वैशिष्ट्ये

भारत व विदेशातून 400+ सहभागी, यामध्ये 40 वक्ते, 150 मौखिक सादरकर्ते व 100 पोस्टर सादरकर्ते.

आयआयटी, एनआयआयटी, इस्रो केंद्रे, सी-डॅक व आघाडीच्या विद्यापीठांकडून आलेल्या प्रगत तंत्रज्ञान सादरीकरणांचे *आयएसपीआरएस अ‍ॅनल्स (कोपर्निकस पब्लिशर्स) मध्ये प्रकाशन.

तीन प्रतिष्ठित स्थळांवर आयोजन – भारती विद्यापीठ (नॉलेज ट्रॅक), यशदा (गव्हर्नन्स ट्रॅक) व सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (मुख्य कार्यक्रम व इंडस्ट्री ट्रॅक).

प्रमुख मान्यवरांमध्ये डॉ. शिमरित मामन (चेअर, इस्रायल स्पेस एजन्सी), प्रा. डॅन ब्लमबर्ग (बेन गुरियन विद्यापीठ, इस्रायल) तसेच भारतातील अग्रगण्य वैज्ञानिक, शैक्षणिक व धोरणनिर्माते.

प्रायोजक प्रदर्शन व युवा संशोधक, शैक्षणिक व पीएचडी विद्वानांचे पोस्टर सादरीकरणातून नवकल्पना व नव्या प्रतिभांचा गौरव.

फ्रंटियर तंत्रज्ञान, एआय, बिग डेटा, ईएसजी सोल्युशन्स, शाश्वतता, आपत्ती व्यवस्थापन व जिओ-व्हिजन 2025 स्टुडंट काँग्रेस मधून विद्यार्थी नवकल्पनांवर विशेष लक्ष.

 

पुणे, 2 सप्टेंबर 2025 – आयएसपीआरएस जीआयएफटीएस शिखर संमेलन 2025 चे उद्घाटन पुण्यात दिमाखदार पद्धतीने झाले. या संमेलनात जागतिक विचारवंत, धोरणकर्ते, संशोधक व उद्योगतज्ज्ञ एकत्र आले. उद्घाटन सोहळा सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या प्रो-चॅन्सलर डॉ. विद्या येरवडेकर व कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमन यांनी केला. मुख्य अतिथी, डॉ. शिमरित मामन, (चेअर, इस्रायल स्पेस एजन्सी) यांनी उद्घाटनपर व्याख्यान दिले. यावेळी पद्मश्री डॉ. प्रमोद काले (माजी संचालक, इस्रो सॅटेलाइट सेंटर), डॉ. पी.एस. रॉय (वरिष्ठ वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ) व डॉ. अंजना व्यास (भूस्थानिक संशोधक व शिक्षिका) उपस्थित होते.

 

संमेलनाचे संयोजक डॉ. शिरीष रावण (संचालक, अर्थसाईट फाउंडेशन) व डॉ. तरुण प्रताप सिंग (संचालक, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ जिओइन्फॉर्मेटिक्स) होते.एमएम अॅक्टिव्ह साय-टेक कम्युनिकेशन्स (पुणे-स्थित) गेली 25 वर्षे विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील कार्यक्रम आयोजित करत असून या संमेलनाची इव्हेंट पार्टनर होती.

 

दिवस 1 – 1 सप्टेंबर 2025

 

गव्हर्नन्स ट्रॅक (यशदा) – धोरणनिर्मिती, आपत्ती व्यवस्थापन व नागरिक सहभागासाठी भूस्थानिक तंत्रज्ञानाचा वापर. वक्त्यांमध्ये निरंजन सुधांशु (डीजी, यशदा), शेखर गायकवाड (अतिरिक्त डीजी, यशदा), प्रा. डॅन ब्लमबर्ग (इस्रायल),डॉ. कुनाल सत्यार्थी (भारत सरकार, DoLR), डॉ. सुहास दिवसे (महाराष्ट्र) व डॉ. शेखर सिंह (पीसीएमसी).

 

 

नॉलेज ट्रॅक (भारती विद्यापीठ) – “युथ फॉर स्पॅशियल फ्यूचर्स” या विषयावर आधारित. प्रमुख वक्ते – डॉ. शमिता कुमार (प्राचार्य, बीव्हीआयईईआर), प्रा. डॉ. विवेक सोजी (कुलगुरू, भारती विद्यापीठ), प्रा. डॉ. सल्वातोरे अमाडुज्जी (इटली), डॉ. शशि कुमार (आयआयआरएस ) व डॉ. अरविंद आर. (बीव्हीआयईईआर).

 

दिवस 2 – 2 सप्टेंबर 2025

सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये दुसऱ्या दिवशी प्रमुख व्याख्याने प्रा. डॅन ब्लमबर्ग (इस्रायल), श्री. हितेश कुमार एस. मकवाना (सर्व्हेयर जनरल ऑफ इंडिया), डॉ. प्रकाश चौहान (संचालक, एनआरएससी), डॉ. कुनाल सत्यार्थी (भारत सरकार) व डॉ. एस.पी. अग्रवाल (संचालक, एनईएसएसी) यांनी दिली. यासोबतच गव्हर्नन्स, नवकल्पना व उद्योगवाढ या विषयांवर पॅनेल चर्चा, तसेच रिमोट सेंसिंग, शाश्वतता, फ्रंटियर तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापनावर समांतर सत्रे झाली.

 

दिवस 3 – 3 सप्टेंबर 2025

या दिवशी तांत्रिक सत्रे, पोस्टर सादरीकरणे व जिओ-व्हिजन 2025 स्टुडंट काँग्रेस होणार आहे. विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प मांडले जातील व जिओ-व्हिजन पुरस्कार प्रदान केले जातील.

 

 

जीआयएफटीएस शिखर संमेलन 2025 हे भारतातील आयएसपीआरएस च्या अलीकडील काळातील सर्वात महत्त्वाच्या कार्यक्रमांपैकी एक आहे. या संमेलनाने पुणेचे नॉलेज कॅपिटल म्हणून स्थान अधिक बळकट केले असून भारताच्या भूस्थानिक नवकल्पना व फ्रंटियर तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वाला नवी गती दिली आहे.

 

 

अधिक माहितीसाठी भेट द्या: ht

tps://www.giftssummit.com

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments