पुणे । : ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) या ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)च्या सीएसआर शाखेने पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील 108 सरकारी शाळांमधील मुलांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली. एकूण 2.10 कोटी रूपयांच्या गुंतवणूकीसह H₂OPE या उपक्रमाद्वारे उत्तम सामुदायिक स्वास्थ्य, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण आणि शिक्षण हक्क कायदा (आरटीई), 2009 च्या कलम 19 द्वारे निर्देशित शाश्वत विकास ध्येयांमध्ये योगदान देण्याप्रती एचएमआयएफची कटिबद्धता दिसून येते. आरटीई 2009 च्या कलम 19 अंतर्गत शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे.
ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशनच्या H₂OPE उपक्रमा अंतर्गत मावळ, पुणे येथील 108 शाळा शुद्ध पिण्याच्या पाणी प्रणालीसह सुसज्ज
RELATED ARTICLES


