Wednesday, September 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रभाग २९ मध्ये "सांस्कृतिक गणेशोत्सव" साजरा करणाऱ्या मंडळांना क्रिएटिव्ह फाउंडेशन लोकोपयोगी...

प्रभाग २९ मध्ये “सांस्कृतिक गणेशोत्सव” साजरा करणाऱ्या मंडळांना क्रिएटिव्ह फाउंडेशन लोकोपयोगी साहित्य भेट देणार – संदीप खर्डेकर. गहिनीप्रसाद सोसायटी पासून सुरुवात – सर्व प्रभागात लोकप्रतिनिधिंनी अनुकरण करण्याचे आवाहन.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार सांस्कृतिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रभाग २९ मधील मंडळांना लोकोपयोगी साहित्य भेट देण्यात येणार आहे अशी घोषणा फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर व विश्वस्त तथा वारजे कर्वेनगर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केली.

गहिनीप्रसाद सोसायटी गणेशोत्सव, एरंडवणे,पटवर्धन बाग येथील मंडळास दैनंदिन आरती व कार्यक्रमांसाठी स्पीकर सेट भेट देताना त्यांनी ही घोषणा केली.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रशांत जोशी,खजिनदार संदीप यदमळ,सौ.आरती प्रशांत जोशी, सौ.रेखा सुदीप निकम, सौ.वेणू संदेश परदेशी, सौ.अक्षदा समीर सातपुते, सौ.स्वाती सुनील माने,श्रीमती रत्नप्रभा हरिश्चंद्र जोशी,देवेंद्र जोशी

केदार जोशी , रिधान निकम , वेदांत परदेशी व इतर सभासद उपस्थित होते.

सध्या कर्णकर्कश आवाजा विरुद्ध पुण्यात जनक्षोभ उसळला आहे. पुणेकर आवाजाला वैतागले असून त्यांना सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा असे वाटते. अश्या परिस्थितीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आशयघन देखावे, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत च्या स्पर्धा,कानाला सोसवेल एवढ्याच आवाजातील स्पीकर ची पातळी, शालीन विसर्जन व स्थापना मिरवणूका हेच नागरिकांना अपेक्षित आहे असे संदीप खर्डेकर म्हणाले.त्यानुसारचं क्रिएटिव्ह फाउंडेशन नागरिकांना आवाहन करत असून सर्वांनीच याबाबत जन भावना लक्षात घेऊन उत्सव साजरा करावा असेही ते म्हणाले.शहराच्या विविध प्रभागातील लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागात असे उपक्रम राबवत विधायक गणेशोत्सव साजरा करण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन ही संदीप खर्डेकर यांनी केली.

क्रिएटिव्ह फाउंडेशन ने यापूर्वी देखील विविध मंडळाना लोकोपयोगी साहित्य भेट दिले असून त्यात प्रामुख्याने मंडळाना लागणारे स्पीकर सेट,कपाट, सतरंज्या, खुर्च्या टेबल, वॉटर कुलर, पंखे,पूजा साहित्य,वॉटर डिस्पेन्सर व इतर साहित्याचा समावेश असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.आमच्या भूमिकेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे ही मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments