Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedएमआयटी डब्ल्यूपीयूच्या प्रांगणात ‘शिवराज्याभिषेक’ छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी चित्तथराक...

एमआयटी डब्ल्यूपीयूच्या प्रांगणात ‘शिवराज्याभिषेक’ छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी चित्तथराक पारंपारीक कलेचे सादरीकरण

पुणे, दि. १९ फेब्रुवारी : ‘जय भवानी, जय शिवाजी’ ची घोषणा, ढोल ताशांचा गजर आणि प्राचिन काळातील युध्द कलांच्या सादरीकरणांने आज संपूर्ण एमआयटी डब्ल्यूपीयूचे वातावरण शिवमय झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोमवारी तिथीनुसार मोठ्या उत्साहात एमआयटी डब्ल्यूपीयूच्या प्रांगणात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, कुलसचिव गणेश पोकळे आणि विविध विभागातीली संचालक उपस्थित होते.
सुरूवातीला विद्यापीठातील शेकडो विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात विविमध्ये मिरवणूक काढण्यात आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेकवर विद्यार्थ्यांनी लघू नाटिका सादर केली यावेळी त्यांच्या ‘राज्यभिषेक’च्या सोहळयाने संपूर्ण वातारवण शिवमय झाले होते. शिवरायांच्या जीवनावर आधारित पोवाड्यांचे सादरीकरण, प्राचिन काळातील युध्द कलांमधील तलवारबाजी, लाठी फिरविणे, दांडपट्टा व भाला चालविणे या सारख्या गोष्टींचे सादरीकरण करण्यात आले.
कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,” छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक दैदीप्तमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराज राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येय धोरणे आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत. त्यामुळेच ही जयंती आज तिथीनुसार आज मोठ्या उत्साहात साजारी करण्यात आली.”

००००००००००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments