पुणे दि. 9 (जिमाका वृत्त सेवा) : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार दि. 22 सप्टेंबर रोजी भोर येथे शिबीर दोरा आयोजित करण्यात आला होता. तथापी या दिवशी स्थानिक सुट्टी (घटस्थापना) असल्याने या दिवशीचा भोर दौरा दि. 23 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व अर्जदारांनी सुधारित दिनांकास शिबीर कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
00000


