पुणे, १४ सप्टेंबर २०२५: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत ब्लेझिंग ग्रिफिंस, कॅप्स रेव्हन्स या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत वरिष्ठ गटात सलामीच्या लढतीत ब्लेझिंग ग्रिफिंस संघाने वन लिटील फार्म सनबर्डस संघाचा 6-3 असा पराभव करून विजयी सलामी दिली. विजयी संघाकडून मधुर इंगळहळीकर, मिहिर विंझे, अविनाश दोशी, बिपिन देव, आकाश सूर्यवंशी, आरुशी पांडे, आरिन माळी, सुदर्शन बिहानी यांनी सुरेख कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात कॅप्स रेव्हन्स संघाने स्पिअर्स संघाचा 5-4 असा संघर्षापपूर्ण पराभव करून शानदार सुरुवात केली. रेव्हन्स संघाकडून प्रतीक धर्माधिकारी, सिद्धार्थ निवसरकर, योहान खिंवसरा, दिप्ती सरदेसाई, चिन्मय चिरपुटकर, निलेश बजाज, केदार नाडगोंडे, यश काळे यांनी अफलातून कामगिरी केली.
किड्स गटात साखळी फेरीत अनय इंगळहळीकर, रोहीन लागू, आनंदी बेडेकर, इरा पाटील, आर्यमन खडके यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर सीगल्स संघाने फिंच संघाचा 3-2 असा पराभव करून तिसऱ्या विजयासह अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या लढतीत जेस संघाने रॉबिन्स संघाचा 3-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
याआधी स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, ट्रूस्पेसचे संचालक अश्विन त्रिमल, उल्हास त्रिमल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे सह सचिव सारंग लागू, क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे, आमोद प्रधान, सिद्धार्थ भावे, अभिषेक ताम्हाणे, शिरीष साठे, ज्योती गोडबोले, नंदन डोंगरे, सुधांशु मेडसीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: साखळी फेरी:
ब्लेझिंग ग्रिफिंस वि.वि.वन लिटील फार्म सनबर्डस 6-3 (खुला दुहेरी 1: मधुर इंगळहळीकर/मिहिर विंझे वि.वि.देवेंद्र चितळे/मनोज गोरे 21-06, 21-08; खुला दुहेरी 2: अविनाश दोशी/बिपिन देव वि.वि.नितीन कोनकर/प्रशांत वैद्य 21-19, 21-20; मिश्र दुहेरी 1: आकाश सूर्यवंशी/आरुशी पांडे वि.वि.प्रिती फडके/गंधार देशपांडे 21-18, 20-21, 15-05; खुला दुहेरी 3: निखिल भाटे/निलेश केळकर पराभुत वि.इशान कुदळे/श्रेयस भामरे 05-21, 11-21; मिश्र दुहेरी 2: ईशान भाले/आनंदिता गोडबोले वि.वि.निधी चितळे/निरण भुरट 21-00, 21-00; खुला दुहेरी 4: आरिन माळी/सुदर्शन बिहानी वि.वि.अभिजीत गानू/आदित्य अभ्यंकर 18-21, 21-14, 15-06; खुला दुहेरी 5: अनिकेत शिंदे/सोहम जोशी पराभुत वि.सुधांशु मेडसीकर/तन्मय चोभे 18-21, 18-21);
कॅप्स रेव्हन्स वि.वि.स्पिअर्स 5-4(खुला दुहेरी 1: प्रतीक धर्माधिकारी/सिद्धार्थ निवसरकर वि.वि.ईशान लागू/हर्षद जोगाईकर 21-15, 21-17; खुला दुहेरी 2: आनंद शहा/देवेंद्र राठी पराभूत वि.जितेंद्र जितकर/विश्वास मोकाशी 17-21, 21-12, 13-15; मिश्र दुहेरी 1:योहान खिंवसरा/दिप्ती सरदेसाई वि.वि.इशा साठे /आदित्य जीतकर 21-18, 21-13; खुला दुहेरी 3: चिन्मय चिरपुटकर/निलेश बजाज वि.वि.दिप्ती कांगो/यश शहा 21-05, 21-06; मिश्र दुहेरी 2: सृष्टी खटोड/रोहित साठे पराभुत वि.गोपिका किंजवडेकर/ईशान पारेख 21-20, 13-21, 08-15; खुला दुहेरी 4: पिनाकीन मराठे/राहुल गांगल पराभुत वि. आदित्य दिवेकर/पृथ्वी शहा 21-14, 21-12; खुला दुहेरी 5: केदार नाडगोंडे/यश काळे वि.वि.अनिरुद्ध रांजेकर/ऋषिकेश पेंडसे 21-16, 21-10);
किड्स गट:
सीगल्स वि.वि.फिंच 3-2(एकेरी 1: अर्जुन बाहुलीकर पराभुत वि.निरण भुरट 10-15, 14-16; खुला दुहेरी 1: अनय इंगळहळीकर/रोहीन लागू वि.वि.शनाया चाफळकर/विहान सोमण 15-10, 15-11; खुला दुहेरी 2: आनंदिनी त्रिमल/शिवांश नाडगोंडे पराभुत वि.आरव श्रॉफ/रियान कुंकुलोळ15-14, 09-15, 11-13. मुली दुहेरी: आनंदी बेडेकर/इरा पाटील वि.वि.आरिका पत्की/अनायशा चाफळकर 15-06, 15-08; एकेरी 2: आर्यमन खडके वि.वि.शिवान कुंकुलोळ 11-08, 10-11, 11-03) ;
जेस वि.वि.रॉबिन्स 3-2(एकेरी 1: इशान जोशी वि.वि.विवान ओगळे 15-08, 15-13; खुला दुहेरी 1: अन्वित राजवाडे/प्रिशा पटवर्धन पराभुत वि.आर्यन गाडगीळ/शंतनू चिरपुटकर 15-06, 11-15, 08-15; खुला दुहेरी 2: क्रिशय दहिभाते/रीत जालन वि.वि.रिषभ बेडेकर/समायरा मेहता 15-11, 15-06; मुली दुहेरी: रिधिमा दिवेकर/रिया चितळे पराभूत वि.समायरा मेहता/समायरा मेंगळे 09-15, 09-15; एकेरी 2: क्रिशय नाटेकर वि.वि.रिषभ आगाशे 11-05, 11-04)


