Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.

पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.

पिंपरी, दि. २० फेब्रुवारी २०२४ :- देशात पहिल्यांदा मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे होते. त्यांनी कमी वयातच दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या संपादक पदाची जबाबदारी उचलली व समर्थपणे पेलली. आपल्या वृत्तपत्राच्या आधारे समाजात प्रबोधन घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता, त्यांनी समाजातील अस्पृश्यता, बालविवाह, जातीभेद इत्यादी गोष्टींच्या विरोधात आवाज उठवून समाजप्रबोधन घडवून आणण्याचे काम केले, असे प्रतिपादन उप आयुक्त मिनीनाथ दंडवते यांनी केले.

आद्य पत्रकार समाजसुधारक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस उप आयुक्त मिनीनाथ दंडवते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुरणिक तसेच कर्मचारी महासंघाचे बालाजी अय्यंगार आदी उपस्थित होते.

बाळशास्त्री जांभेकर यांना विविध विषय तसेच अनेक भाषांचे ज्ञान होते. त्यांनी सुरू केलेला पहिला मराठी वृत्तपत्र दर्पण हे साडेआठ वर्षे चालले. त्यांनी दिग्दर्शन या मराठीतील पहिल्या मासिकाची सुरूवातही केली होती. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी जवळपास ५ वर्षे काम पाहिले. विज्ञान, भुगोल, गणित तसेच सामान्य ज्ञान या विषयांवरही त्यांचा सखोल अभ्यास होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments