पुणे, २० फेब्रुवारी २०२४: चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे पुण्यात जे.डब्ल्यू.मॅरिएट येथे १५ ते १७ मार्च २०२४ दरम्यान ८ व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद – २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. मधुमेह असणाऱ्या रूग्णांची संख्या आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतींचा सामना करण्यासाठी योग्य उपाययोजना जाणून घेण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून “आयसर”, पुणे चे संचालक प्रा. सुनील भागवत आणि सन्माननीय अतिथी म्हणून “एएफएमसी” पुणे चे कमांडंट डॉ. (ले.जन.) नरेंद्र कोतवाल हे उपस्थित असतील. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुणालय, पुणे चे एमेरिटस प्राध्यापक, डॉ. गुरुराज मुतालिक हे देखील उद्घाटन समारंभाला उपस्थित असतील. चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व चीफ एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. उन्नीकृष्णन एजी, चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. (ब्रिगेडियर) अनिल पंडित, चेलाराम हॉस्पिटल – डायबेटिस केअर अँड मल्टीस्पेशालिटीच्या आयसीयू आणि इन पेशंट विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत भालेकर , ऍडमिनिस्ट्रेशन आणि न्यू प्रोजेक्टस विभागाचे प्रमुख डॉ.प्रसन्न ढोरे, चेलाराम वेलनेस सेंटरचे प्रमुख विश्वास वलावलकर, चेलाराम हॉस्पिटलच्या कामकाज प्रमुख दीपाली कुंजीर,चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटच्या शैक्षणिक विभागाचे प्रमुख डॉ.शैलेश देशपांडे आणि ब्ल्यू सर्कल डायबेटिस फाऊंडेशनच्या संस्थापिका नुपूर ललवाणी आदी मान्यवर पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
या परिषदेत मधुमेहाच्या गुंतागुंतींचे व्यवस्थापन, किफायतशीर दरात मधुमेह उपचार, नवीन प्रगती आणि मधुमेह व्यवस्थापनातील तंत्रज्ञानाची भूमिका या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. मधुमेहाचा एक महत्त्वाचा जोखीम घटक म्हणजे स्थूलपणा, ज्याच्यावरील उपचारांबद्दल या परिषदेमध्ये सविस्तर चर्चा केली जाईल.
अमेरिकेतील मेयो क्लिनिक, यूकेमधील इंपिरिअल कॉलेज, युनिव्हर्सिटी ऑफ लेस्टर, युनिव्हर्सिटी ऑफ डंडी आणि कील युनिव्हर्सिटी, स्वीडनमधील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूट, दक्षिण आफ्रिकेतील स्टेलेनबॉश युनिव्हर्सिटी, तसेच सिंगापूरमधील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर येथील तज्ञ, व यांबरॊबरच ७० हून अधिक नामवंत भारतीय तज्ञ या परिषदेत संवाद साधणार असून २,००० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहतील.
चेलाराम फाउंडेशन डायबेटिस रिसर्च अवॉर्ड्स – २०२४: या मध्ये मूलभूत संशोधन तथा क्लिनिकल संशोधन श्रेणीतील (रु. २ लाख आणि रु. १ लाख पुरस्कार राशी) जिंकण्यासाठी ८० हून अधिक युवा संशोधक प्रबंध सादर करणार आहेत.चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूट आणि ब्लू सर्कल फाऊंडेशन तर्फे रविवार १७ मार्च रोजी आयोजित केलेल्या “रन फॉर डायबेटिस” – ३ किमी मॅरेथॉनमध्ये टाइप १ मधुमेह असलेली मुले सहभागी होतील.
८ व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद – २०२४ चे आश्रयदाता आणि चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचे अध्यक्ष श्री. लाल चेलाराम म्हणतात की, चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूट ही संस्था मधुमेहाचे उपचार, संशोधन, शिक्षण आणि जागरूकता अशा उपक्रमांद्वारे मधुमेहाचा सामना करण्यात अग्रगण्य राहिली आहे.
चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उन्नीकृष्णन ए.जी. म्हणाले की, ८ व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद – २०२४ मध्ये प्रख्यात मधुमेह तज्ञ हे मधुमेह उपचार पध्दतींबाबत मार्गदर्शन करतील. ही परिषद एक शैक्षणिक व्यासपीठ असून, याच्या माध्यमातून अनेक मधुमेही रुग्णांचे जीव वाचविण्यात मदत होईल.
चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. (ब्रिगेडियर) अनिल पंडित म्हणाले की, चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटमध्ये एकाच छताखाली अद्ययावत सेवा-सुविधा उपलब्ध असून, मधुमेह आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतींचा सामना करण्यासाठी संस्था अग्रस्थानी राहिली आहे.
८ व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद – २०२४ चे उद्दिष्ट देशातील आरोग्यसेवेत कार्यरत असणाऱ्यांना मधुमेह आणि त्याच्या गुंतागुंतींबद्दल सर्वसमावेशक ज्ञान प्रदान करणे आहे.


