राष्ट्रीय, २० फेब्रुवारी २०२४: आकासा एअर या भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या विमानसेवेने देशातील बेंगळुरू, नवी दिल्ली, वाराणसी, हैदराबाद, लखनौ, अहमदाबाद, गुवाहाटी, कोलकाता आणि पुणे या नऊ प्रमुख शहरांमधील विमानतळांवर डिजियात्राच्या फेशियल रेकग्निशन सिस्टमचा अवलंब करण्याची पुष्टी दिली. डिजियात्राच्या अवलंबनामधून आकासा एअरची नाविन्यतेप्रती, तसेच प्रवाशांना अद्वितीय प्रवास अनुभव देण्याप्रती कटिबद्धता दिसून येते.
डिजियात्रा सेवा पूर्णत: बायोमेट्रिक-आधारित सेल्फ-बोर्डिंग सोल्यूशन आहे, जे प्रवाशांना विनासायास प्रवास अनुभवाची खात्री देते. विमानतळावरील टर्मिनलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रवासी सोईस्करपणे त्यांचे ओळखपत्र आणि बायोमेट्रिक डेटा यांच्यासह त्यांच्या फ्लाइटच्या माहितीची युजर-अनुकूल डिजियात्रा अॅपवर नोंदणी करू शकतात. ते विमानतळावर नेव्हिगेट करत असतना अत्याधुनिक बायोमेट्रिक तंत्रज्ञान प्रवाशांच्या ओळखीचे सत्यापन व प्रमाणीकरण करते, ज्यामुळे सर्वोच्च दर्जाच्या सुरक्षिततेची खात्री मिळते.
डिजियात्रा आकासा एअर ग्राहकांसाठी पुढील विमानतळांवर उपलब्ध आहे
१.
केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरू
२.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी दिल्ली
३.
लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाराणसी
४.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद
५.
चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, लखनौ
६.
सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबाद
७.
लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुवाहाटी
८.
नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोलकाता
९.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे
डिजियात्रासाठी नोंदणी करण्याकरिता प्रवाशांना खालील पायऱ्यांचे पालन करावे लागेल:
तुमच्या आधार लिंक मोबाइल क्रमांकाचा वापर करत अँड्रॉईड व अॅप्पल स्टोअरवर उपलब्ध डिजियात्रा अॅप डाऊनलोड करा.
तुमच्या आधार डिजि लॉकरचा वापर करत लिंक करा. डिजि लॉकरसह नोंदणीकृत नसल्यास कृपया तुमचा आधार क्रमांक वापरत नोंदणी करा. तुमचे आधारवरील नाव आणि फ्लाइट तिकिटावरील नाव समान असण्याची खात्री घ्या.
सुस्पष्टपणे सेल्फी क्लिक करा, तुमच्या आधारसह सत्यापित करा आणि क्रेडेन्शियल्स सेव्ह करा.
तुमच्या फ्लाइटच्या २४ तास अगोदर डिजियात्रा अॅपवर तुमचे बोर्डिंग पास अॅड करा आणि कन्फर्मेशन मिळवा.
ऑगस्ट २०२२ मध्ये लाँच झाल्यापासून आकासा एअरने ७.७५ दशलक्षहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे आणि मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, कोची, दिल्ली, गुवाहाटी, अगरतळा, पुणे, लखनौ, गोवा, हैदराबाद, वाराणसी, बागडोगरा, भुवनेश्वर, कोलकाता, पोर्ट ब्लेअर, अयोध्या, ग्वाल्हेर, श्रीनगर आणि दोहा (कतार) या २१ शहरांशी कनेक्ट होते. फ्लाइट्स आणि विविध ग्राहक-अनुकूल मूल्यवर्धित सेवांसाठी बुकिंग्ज www.akasaair.com वर, तसेच अँड्रॉईड व आयओएस अॅप, ट्रॅव्हल एजंट्स आणि देशभरातील विविध ओटीएवर करता येऊ शकतात.
अधिक किफायतशीर दरांमध्ये विमानप्रवासाचा आनंद घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअर किंवा अॅप्पल अॅप स्टोअरवरून आकासा एअर अॅप डाऊनलोड करा!


