Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedवाहन भाडेतत्वावर देण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन*

वाहन भाडेतत्वावर देण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन*

*
पुणे, दि. २०: उपसंचालक, नगररचना, वाहतूक व परिवहन, पुणे कार्यालयाकरिता टॅक्सी वातानुकूलीत सेदान स्विफ्ट डिझायर गाडी तात्पुरत्या स्वरुपात भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून वाहन मालकांनी सिलबंद पाकिटात 28 फेब्रुवारी रोजी 5 वाजेपर्यंत दर पत्रक सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नगररचना उपसंचालक आकाश बागुल यांनी केले आहे. विहीत अटी व शर्तीच्या अधिन राहून दरपत्रके मागविण्यात आली आहेत. यामध्ये वाहनाचे इंधन खर्च वाहन मालकाचा राहील, वाहन ताब्यात घेतल्यापासूम ते परत केल्यापर्यंतचा कालावधी भाडे अदायगीसाठी धरला जाईल, पहिल्या 24 तास किवा त्याच्या भागाकरिता 24 तासाचे भाडे देय राहिल, 24 तासात 300 कि.मी. पेक्षा जास्त धाव झाल्यास जास्तीच्या धावेसाठी प्रति कि.मी. भाड़े देय होईल. वाहनाचा देखभाल खर्च, इतर खर्च तसेच अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वाहन मालकाचीच राहील, वाहन नादुरुस्त, खराब, अपघातग्रस्त झाल्यास लगेचच दुसरे बदली वाहन पुरविण्याची जबाबदारी वाहन असेल, आदी अटी व शर्ती समाविष्ट आहेत.

निविदेच्या अटी व शर्ती उसंचालक, नगर रचना, वाहतूक व परिवहन, पुणे या कार्यालयास पाहावयास मिळतील, असेही कळविण्यात आले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments