Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रख्यात गझलगायिका गायत्री अशोकन यांचा पुण्यातील पहिला कार्यक्रम "हेल्प आर्टिस्ट इंडिया...

प्रख्यात गझलगायिका गायत्री अशोकन यांचा पुण्यातील पहिला कार्यक्रम “हेल्प आर्टिस्ट इंडिया फाऊंडेशन”तर्फे आयोजित “एचएआई जलसा मध्ये, “एचएआई जलसा,हा कार्यक्रम रविवार, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ६ वाजल्यापासून गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे होत आहे.

पुणे, महाराष्ट्र: पुण्यातील संगीत रसिकांसाठी एक अविस्मरणीय संगीत मेजवानी मिळणार आहे. प्रख्यात गझलगायिका गायत्री अशोकन या प्रथमच पुण्यात कार्यक्रम करणार असून “हेल्प आर्टिस्ट इंडिया फाऊंडेशन”तर्फे आयोजित “एचएआई जलसा” या भव्य सोहळ्याच्या उद्घाटनावेळी तो होणार आहे. हा कार्यक्रम रविवार, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ६ वाजल्यापासून गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे होत आहे. हा कार्यक्रम दिग्दर्शक आणि निर्माते फर्झ खान यांच्या सर्जनशील प्रतिभेतून साकारतो आहे.

गायत्री अशोकन यांनी गझल क्षेत्रात स्वतःची अशी खास ओळख निर्माण केली आहे. त्यांचा पहिला अल्बम “गझल गेज” हा पद्मश्री पंकज उधास यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित झाला होता. यात सुकून हे हृदयस्पर्शी गाणे होते, ज्याचे संगीत पुर्बयान चॅटर्जी यांनी दिले होते तर तबल्यावर उस्ताद झाकीर हुसेन यांनी साथ दिली होती. त्यांची अलीकडची एकल रचना “दिल के बहलाने” ही त्यांनी स्वतः संगीतबद्ध केली होती. ती पद्मश्री हरीहरन यांनी खजाना फेस्टिव्हल ऑफ गझल्समध्ये प्रकाशित केली.

 

मल्याळम चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या पार्श्वगायनाला विशेष दाद मिळाली आहे. इलयराजा, विद्यासागर, के. जे. येसुदास यांसारख्या दिग्गजांसोबत गायन करण्याची संधी त्यांना मिळाली आहेच पण त्याचबरोबर केरळ राज्य पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. गायत्री यांनी आपली कलाकृती गझल या अमर्याद व अभिजात शैलीसाठी वाहून घेतली आहे. पुण्यातील त्यांचे हे पहिले सादरीकरण ही या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

 

या कार्यक्रमाबद्दल बोलताना गायत्री अशोकन म्हणाल्या, “संगीताची खरी जाण आणि प्रेम असलेल्या पुण्याचे माझ्या हृदयात सदैव विशेष स्थान आहे. येथे प्रथमच गझल सादर करण्याची संधी मिळणे, माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. “एचएआई जलसा”मध्ये सहभागी होणे आणि इतक्या जाणकार व उत्साही प्रेक्षकांसमोर सादरीकरण करणे ही माझ्यासाठी गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.”

 

त्यांच्यासोबत व्यासपीठावर सैफ नईम अली थिरकवा सहभागी होत आहेत. ते एका महान संगीत परंपरेचे वारसदार आहेत. ते उस्ताद पद्मभूषण अहमद जान थिरकवा या भारतातील एका महान तबला वादकांपैकी एकअसलेल्या कलाकाराचे नातू व प्रख्यात सूफी आणि गझल गायक नईम अली थिरकवा यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या सादरीकरणातून त्यांच्या वारशाची गौरवशाली परंपरा पुढे चालवली जाईल.

 

या उपक्रमाविषयी बोलताना “हेल्प आर्टिस्ट इंडिया फाऊंडेशन”चे संचालक श्री. अशोक राजपूत म्हणाले,

“एचएआई जलसा” ही फक्त एक मैफिल नसून, हे असे एक व्यासपीठ आहे जिथे प्रस्थापित दिग्गज कलाकार व नवोदित प्रतिभावंत एकत्र येऊन संगीताची जादू प्रत्यक्षात आणतात. प्रख्यात गझलगायिका गायत्री अशोकन यांच्या पहिल्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही या प्रवासाची एक आगळी सुरुवात करण्यास उत्सुक आहोत.”

 

पुण्यानंतर “एच ए आई जलसा”ची सुरुवात केल्यानंतर आता ही मालिका दिल्ली, इंदूर आणि जयपूर अशा अन्य शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे. पुढील कार्यक्रम दिल्लीतील ऐवान-ए-गालिब ऑडिटोरियममध्ये होणार आहे.

 

२०१८ मध्ये स्थापन झालेल्या “हेल्प आर्टिस्ट इंडिया फाऊंडेशन”ने भारतीय कलाप्रकार व कलाकारांच्या प्रसारासाठी देशभरात सातत्याने कार्य केले आहे. नुकत्याच झालेल्या “सोल इंडिया” या भव्य कार्यक्रमात या फाऊंडेशनने पद्मश्री हरीहरन यांचा एकल कार्यक्रम मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम, दिल्ली येथे आयोजित केला होता.

 

तिकीटांची नोंदणी BookMyShow व

र सुरू आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments