Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रत्येक विद्यार्थी हा चांगला नागरिक बनला पाहिजे* *निवृत्त...

प्रत्येक विद्यार्थी हा चांगला नागरिक बनला पाहिजे* *निवृत्त हवाई दल अधिकारी अभिजीत खेडकर : सैनिक मित्र परिवाराच्यावतीने खेडकर यांचा सन्मान*

 

 

पुणे : सैन्यासाठी साधनसामग्री अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार होणारी आधुनिक साधने उत्कृष्ट दर्जाची आहेत. मात्र, भविष्याचा विचार करता या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या आपली शिक्षणव्यवस्था मजबूत करणे अत्यावश्यक आहे. शिक्षण व्यवस्थेतून घडलेला प्रत्येक विद्यार्थी हा जबाबदार व सुजाण नागरिक बनला पाहिजे. यासाठी शासनानेही ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे झाले तर पुढील पंधरा वर्षांत भारत विकसित राष्ट्र बनू शकेल, असे मत निवृत्त हवाई दल अधिकारी ग्रुप कॅप्टन अभिजीत खेडकर यांनी व्यक्त केले.

 

सैनिक मित्र परिवाराच्यावतीने विजयादशमीच्या निमित्ताने पराक्रमी सेनाधिकारी यांच्या निवासी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. निवृत्त हवाई दल अधिकारी ग्रुप कॅप्टन अभिजीत खेडकर यांचा सन्मान त्यांच्या मॉडेल कॉलनी मधील निवासस्थानी करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, दीपलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ आदी यावेळी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या संयोजनात गिरीश पोटफोडे, कल्याणी सराफ, नितीन पंडीत, सुवर्णा बोडस, शेखर कोरडे, किरण पाटोळे,पराग ठाकूर, विष्णू ठाकूर गिरीजा पोटफोडे यांनी सहभाग घेतला. पुणेरी पगडी, उपरणे, सन्मानचिन्ह देऊन खेडकर यांचा गौरव करण्यात आला.

 

पांडुरंग बलकवडे म्हणाले, वर्तमान काळातील आदर्श व्यक्तींचा सन्मान यानिमित्ताने होत आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून सैनिक येतात, एकत्र राहतात याला खरी समरसता म्हणतात. जात, पंथ, भाषा माहित नसते. सैन्यात अवघा भारत एक असतो.

 

आनंद सराफ म्हणाले, सन १९९६ पासून सैनिकांसाठी कृतीशील काम करण्याचा प्रयत्न सैनिक मित्र परिवाराच्या माध्यमातून केला जात आहे. तिरंगी झेंडयासाठी प्राण पणाला लावणा-या सैनिकांच्या प्रत्येक सणाला पहिला मान आहे. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन हे सण साजरे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भूमी आणि मातृभूमी यातील फरक जाणून घेण्याकरीता प्रत्येकाने सैनिकाचे जीवन समजून घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments