Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोविड लस तज्ञ लसीकरण केंद्रावर उपलब्ध

कोविड लस तज्ञ लसीकरण केंद्रावर उपलब्ध

‍पिंपरी, दिनांक- २२/०१/२०२४:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर उपलब्ध लसीच्या साठयानुसार वय वर्षे १८ व पुढील नागरिक यांना ‘इन्कोव्हॅक’ लसीचा प्रिकॉशन डोस (ज्यांना कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लसीच्या दुस-या डोसनंतर ०६ महिने किंवा २६ आठवडयाचा कालावधी पुर्ण झालेला आहे.) ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप या पध्दतीने नाकावाटे देण्यात येणार आहे. या अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेल्या निकषानुसार लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल.
दि.२३ फेब्रुवारी २०२४ ते दि.२२ मार्च २०२४ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची फक्त ‘इन्कोव्हॅक’ लसीकरणासाठी निश्चित केलेली लसीकरण केंद्रे
अ.क्र
प्रभाग
लसीकरण केंद्राचे नाव
‘इन्कोव्हॅक’
Front line worker व Health care worker व वय १८ वर्षावरील लाभार्थींना प्रिकॉशन डोस संख्या


कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल,आकुर्डी
२०


क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड
२०


नवीन थेरगांव रुग्णालय, थेरगाव
२०


नवीन भोसरी रुग्णालय, भोसरी
२०


यमुनानगर रुग्णालय
२०


नवीन जिजामाता रुग्णालय
२०


अहिल्यादेवी होळकर सांगवी मनपा शाळा
२०


कै.यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, कुटुंब कल्याण विभाग, रुम नं.६२
२०

सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी- ९.३० ते सायं. ४.३० या कालावधीत करण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग, जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.
सदर च्या ‘इन्कोव्हॅक’ कोविड १९ लसीचा पहिला व दुसरा डोस कोणत्याही लाभार्थ्याला देण्यात येणार नाही.
‍पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.
लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे दर रविवारी बंद राहतील.
यापुढे लसीकरण केंद्रामध्ये बदल असल्यास वार्तापत्र प्रसिध्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल तोपर्यंत पुर्वी प्रसिध्द केलेले वार्तापत्र ग्राह्य धरण्यात यावे व त्यानुसार पिं.चिं.म.न.पा.लसीकरण केंद्रावर कार्यवाही करण्यात येईल. तसेच नागरिकांना सदरचे वार्तापत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments