पुणे, २२ फेब्रुवारी २०२४ : कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सी आय आय ) पुणे तर्फे नुकतेच हॉटेल हयात रीजन्सी, पुणे येथे 24 वी वार्षिक बैठक पार पडली. या वार्षिक बैठकीमध्ये सँडविक कोरोमंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्त अधिकारी किरण आचार्य यांची 2024-25 या वर्षासाठी सीआयआय पुणे झोनल कौन्सिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. किरण आचार्य यांनी सीए,सीएस आणि एलएलबी चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना वित्त, कर, अनुपालन, लेखापरीक्षण, सचिवीय आणि कायदेशीर क्षेत्रातील 35 वर्षांचा स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदीर्घ अनुभव आहे. सॅन्डविक मधील 20 पेक्षा अधिक वर्षांच्या कामाच्या अनुभवामध्ये किरण आचार्य यांनी मुख्य वित्त अधिकारी पदाच्या जबाबदारीबरोरच इंटरनॅशनल टॅक्सेशन आणि ट्रान्सफर प्राइस यासारख्या जबाबदाऱ्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सांभाळल्या आहेत. त्यांनी एम अँड ए आणि कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग आणि अनेक स्थानिक आणि जागतिक प्रकल्प हाताळले आहेत.2019 मध्ये सँडविकमध्ये पुन्हा काम सुरु करण्याआधी, त्यांनी सिग्मा इलेक्ट्रिकमध्ये ग्लोबल सीएफओ म्हणून काम केले आहे.
आरएसबी ट्रान्समिशन्स (इंडिया) लिमिटेडचे कार्यकारी संचालक रजनीकांत बेहरा यांची 2024-25 या वर्षासाठी सीआयआय पुणे झोनल कौन्सिलचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रजनीकांत बेहरा हे कार्यकारी संचालक – ग्रुप फायनान्स म्हणून कार्यरत असून त्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आणि विशेष कौशल्य आहे. रजनीकांत बेहरा यांनी लीड्स युनिव्हर्सिटी बिझनेस स्कूल, यूके येथून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून यूएस मधील इलिनॉयस ऍडवान्सड मॅनुफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी असोसिएट सिक्स सिग्मा इन्स्टिट्यूट मधून सिक्स सिग्मा मध्ये प्रमाणित ग्रीन बेल्ट मिळविला आहे.
आरएसबी समूहामध्ये दोन दशके समर्पित कार्य करणारे रजनीकांत हे एम अँड ए सह भांडवल उभारण्याच्या व्यवहारात महत्वाची भूमिका बजावतात. सध्याच्या आपल्या भूमिकेत ते वित्त विभागातील नेतृत्व टीम्सबरोबर सहयोगात्मक काम करत असून धोरणात्मक अंतर्दृष्टी प्रदान करणे, प्रशासन,कायदेशीर अनुपालन, आर्थिक नियोजन आणि विश्लेषण यासारख्या अनेक गोष्टींमध्ये या टीम्सबरोबर ते काम करतात.


