**
पुणे, दि. २३ : पुनर्वसन महासंचालक कार्यालय (डीजीआर), माजी सैनिक कल्याण विभाग, संरक्षण मंत्रालय यांच्यामार्फत २ मार्च रोजी क्रीडा मैदान, तानाजी डिफेन्स कॉलनी, सायन-ट्रॉम्बे रोड, मानखुर्द (पूर्व), मुंबई येथे माजी सैनिकांच्या पुर्नरोजगार आणि पुनर्वसनासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.
नोकरीसाठी इच्छुक असणारे पात्र माजी सैनिक आणि उद्योग क्षेत्रातील नियोक्ते यांच्यात थेट आणि त्वरित संवाद साधणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. अधिक माहितीसाठी सहसंचालक, नवी दिल्ली दूरध्वनी क्रमांक ०११-२०८६२५४२ व पुनर्वसन महासंचालक कार्यालय (दक्षिण), पुणे भ्रमणध्वनी क्रमांक ८३३३८६३९५७, ७०३२८४९५८१ वर संपर्क साधावा.
जिल्ह्यातील इच्छुक सर्व माजी सैनिकांनी माजी सैनिक ओळखपत्र आणि पाच प्रती बायोडाटा फोटोसह मेळाव्यात उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), यांनी केले आहे.
०००


