Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedकृषी सेवक पदांची भरतीप्रक्रिया अंतिम टप्प्यात

कृषी सेवक पदांची भरतीप्रक्रिया अंतिम टप्प्यात

पुणे, दि. २३ : कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयातील विभागीय कृषी सहसंचालक (सर्व) यांच्या आस्थापनेवरील कृषी सेवक पदांसाठी भरतीप्रक्रिया आय.बी.पी.एस या संस्थेमार्फत १६ व १९ जानेवारी रोजी करण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल अद्यापही न लागल्यामुळे उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत आहे. त्याअनुषंगाने भरती प्रक्रिया अंतिम टप्यामध्ये असून यथाशिघ्र निकाल लावण्यासाठी आय.बी.पी.एस या संस्थेस कळविले आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालयाचे प्रशासकीय अधिकारी अखिल शेंडे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments