पुणे, २४ फेब्रुवारी २०२४: युवा उद्योजक आणि मा. नगरसेवक श्री सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमीत्त (२० फेब्रुवारी)सोमेश्वर फौंडेशनच्या वतीने आयोजित सुपर सनी विक”जिल्हा स्तरीय तायक्वांदो स्पर्धेत विवान दिघे,श्लोक बांदल, शिव मुके,अर्णव कोंढरे, यशवीर कासार,श्रीपाद नेवस्कर, परीशा सूर्यवंशी,स्पृहा आडकर, .प्रजेश भांदककर यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
सेंट्रल पार्क, जंगली महाराज रोड येथे पार पडलेल्या या स्पर्धेत १० वर्षाखालील(१८किलो) मुलांच्या गटात विवान दिघेने प्रथम क्रमांक, तर अद्विक दिघेने दुसरा क्रमांक पटकावला. सब – ज्युनियर (१८ किलो)मुलांच्या गटात श्लोक बांदलने पहिला क्रमांक, तर ईशान दारवाटकर व शिवांश आढाव यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
१० वर्षाखालील(२७किलो)मुलांच्या गटात प्रजेश भांदककरने विजेतेपद पटकविले, तर ईश्वर जाधवने दुसरा क्रमांक पटकवला. १० वर्षाखालील(२४किलो)मुलींच्या गटात स्पृहा आडकर हिने सुवर्णपदक पटकावले. तर, अहाना गर्देने रजत पदक व राधा साईगावकरने कांस्यपदक पटकावले. ८ वर्षाखालील(१६ ते १८ किलो)मुलांच्या गटात शिव मुके याने विजेतेपद पटकावले. १० वर्षाखालील(२२किलो)मुलांच्या गटात अर्णव कोंढरे याने विजेतेपद पटकावले. ८ वर्षाखालील(१८ ते २०किलो) मुलांच्या अ गटात यशवीर कासार याने तर, ब गटात श्रीपाद नेवस्कर याने सुवर्णपदक मिळवले. १० वर्षाखालील(२२किलो)मुलींच्या गटात सान्वी इनामदार हिने विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचे उद्घाटन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात आपटे रोड वारील सेंटर पार्क कार्यालयात करण्यात आले. शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, युवा उद्योजक आणि माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक मुकारी अलगुडे, बाळासाहेब बोडके, उदय महाले, संतोष लांडगे, चंद्रशेखर कपोते, उमेश वाघ, अभिषेक परदेशी, किरण पाटील, अनिश गाडे तायक्वांदो ऑर्गनायझेशनचे मिलिंद पठारे, प्रवीण बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. सोमेश्वर फाउंडेशन चे अनिकेत यांनी सर्वांचे स्वागत केले.
निकाल: (प्रथम, द्वितीय व तृतीय या नुसार):
१० वर्षाखालील(१८किलो) मुले: १. विवान दिघे, २. अद्विक दिघे;
सब – ज्युनियर (१८ किलो)मुले: १. श्लोक बांदल, २.ईशान दारवाटकर, ३.शिवांश आढाव;
८ वर्षाखालील(१६ ते १८ किलो)मुले: १.शिव मुके, २.ईशान दारवाटकर, ३.शर्विल सावंत;
१० वर्षाखालील(२२किलो) मुले: १.अर्णव कोंढरे, २.नीरज सूर्यवंशी, ३.प्रसन्न मिसाळ;
८ वर्षाखालील(१८ ते २०किलो) मुले(गट अ): १. यशवीर कासार, २.अविनाश करकंडे, ३.आर्यन सुतार;
८ वर्षाखालील(१८ ते २०किलो)मुले(गट ब):१. श्रीपाद नेवस्कर, २.अंशुल बांदल, ३.अक्षत दिघे;
१० वर्षाखालील(२२किलो)मुली: १.सान्वी इनामदार, २.नित्या साखरे, ३.आराध्या चव्हाण;
१० वर्षाखालील(२३किलो) मुली: १.परीशा सूर्यवंशी, २.सई गुरव, ३.आस्मि कोंढरे;
१० वर्षाखालील(२७किलो)मुले: १.प्रजेश भांदककर, २.ईश्वर जाधव;
१० वर्षाखालील(२४किलो)मुली: १.स्पृहा आडकर, २.अहाना गर्दे, ३.राधा साईगावकर.


