Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुंबई २६ / ११ हल्ल्यातील हुतात्म्यांना पुणे शहर पोलिसांची मानवंदना सारसबागेत चित्रकलेतून...

मुंबई २६ / ११ हल्ल्यातील हुतात्म्यांना पुणे शहर पोलिसांची मानवंदना सारसबागेत चित्रकलेतून ४ हजार ३०० चिमुकल्यांनी वाहिली आदरांजली : सेवा मित्र मंडळ, पुणे शहर पोलीस यांच्यावतीने आयोजन

पुणे : मुंबईमधील २६/११ हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुणे पोलीस दलासह पुणेकरांनी मानवंदना दिली. हुतात्मा सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून उभारलेल्या स्तंभाला बँडच्या साथीने मानवंदना देत त्यांच्या हौतात्म्याला पुणे पोलिसांनी सलाम केला. पोलिसांसह ४ हजार ३०० शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

 

मुंबईमध्ये २६ / ११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे सारसबागेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुणे शहर पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पंकज देशमुख, संजय पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवनकर, कृषीकेश रावले, मिलिंद मोहिते, संभाजी कदम, संदीप भाजीभाकरे, हिंमत जाधव, सहा. पोलीस आयुक्त राहुल आवारे यांसह राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, राजाभाऊ कदम, डॉ. मिलिंद भोई, उदय जगताप तसेच पोलीस खात्यातील निवृत्त अधिकारी उपस्थित होते.

 

या प्रसंगी पुणे पीपल्स बँकेच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. बँकेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अँड सुभाष मोहिते, उपाध्यक्ष बिपिन शहा व प्रतीक गुजराती हे उपस्थित होते. सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, अध्यक्ष नितीन होले, अमर लांडे, सचिन ससाने, उमेश कांबळे, विक्रांत मोहिते, परग शिंदे, विशाल भोसले, दत्ता मिसाळ, जगदीश शेटे, सुनील जाधव, राजाभाऊ महाडिक यांनी उपक्रमाचे आयोजन केले. यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी केले.

 

चित्रकला स्पर्धा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण विवेक खटावकर, गिरीश चरवड, संदीप गायकवाड, समीर धर्माधिकारी, नितीन पासलकर, सुधीर लिंगायत , नितीन होले, मनोहर देसाई यांनी केले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, राहुल आवारे, रामराज्य सहकारी बँकेचे बाळासाहेब रायकर, हरिदास चव्हाण, पराग ठाकूर यांच्या हस्ते झाला. सूत्रसंचालन प्रसाद भारदे यांनी के

ले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments