एरंडवणे गणेशनगर भागातील पूरग्रस्त वसाहत भागात असणाऱ्या ऐतिहासिक व जागरूक मानल्या गेलेल्या श्री. शनि मंदिराचा जीर्णोद्धार व नुतनीकरण पूर्ण झाले असून, शनिवार दि. २९ नोव्हेंबर रोजी पूर्ण दिवस सकाळी ८ पासून रात्री ८ पर्यंत मंदिर परीसरात विवध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लघुरुद्र व अभिषेक, नगर प्रदक्षिणा, शनेश्वर याग, वास्तुशांती पूजन, कलश पूजन व महाप्रसाद, रामरक्षा व हनुमान चालीसा पठण, महा आरती व प्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन संपूर्ण दिवसभर करण्यात आले आहे. १० चाळ, पूरग्रस्त वसाहत, गणेशनगर, एरंडवणे येथे संपन्न होणाऱ्या या धार्मिक महोत्सवाचे श्री. शनि मारुती बाल गणेश मंदिर ट्रस्ट यांनी संयोजन केले आहे. सर्व भाविकांनी दर्शन व प्रसादासाठी येण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष दिपक केशवराव निकम यांनी केले आहे.


