ही सहल कंपनीच्या ‘प्रॉफिट-शेअर बोनान्झा’ पुरस्कार योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आली होती.
ऐतिहासिक किल्ल्यांपासून ते लंडनच्या प्रसिद्ध स्कायलाइन्सपर्यंत – कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आठवडाभराची अविस्मरणीय सहल आयोजित केली आहे. खरी यशस्वी संस्था म्हणजे कर्मचाऱ्यांना महत्व देणे हे त्यांनी सिद्ध केले आहे.
चेन्नई, 27 नोव्हेंबर 2025: आपल्या यशामध्ये कर्मचाऱ्यांना सर्वात महत्त्वाचे स्थान देणाऱ्या कार्यसंस्कृतीचे पालन करत, भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या कॅसाग्रँड कंपनीने आपल्या 1,000 कर्मचाऱ्यांना आठवडाभराची पूर्ण प्रायोजित लंडन सहल भेट देऊन आनंदित केले. ही सहल कंपनीच्या वार्षिक कर्मचारी पुरस्कार उपक्रम ‘प्रॉफिट शेअर बोनान्झा’ अंतर्गत आयोजित करण्यात आली होती.
या प्रॉफिट शेअर बोनान्झा उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत 6,000 हून अधिक कर्मचाऱ्यांनी सिंगापूर, थायलंड, मलेशिया, दुबई, स्पेन आणि इतर अनेक देशांमध्ये प्रवास केला आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी या सहलींना त्यांच्या आयुष्यात बदल घडवणारे आणि प्रेरणा देणारे अनुभव म्हटले आहे. दरवर्षी हा उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणावर राबवला जातो, कारण कंपनीला विश्वास आहे की तिचे यश कर्मचाऱ्यांमुळे शक्य आहे आणि त्यामुळे त्यांच्यासोबत हे यश खास पद्धतीने साजरे केले पाहिजे.
भारत आणि दुबईतील विविध कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना एकत्र आणत, लंडनची ही सहल त्यांच्या शहराच्या इतिहास, संस्कृती आणि आकर्षणाचा संस्मरणीय अनुभव देण्यासाठी तयार केली गेली आहे आहे. या सहलीत विंडसर कॅसलचा ऑडिओ गाईडेड टूर, कॅम्डन मार्केटच्या रंगीबेरंगी गल्लींचा अनुभव, आणि इंटरकॉन्टिनेंटल लंडन येथे भव्य गाला डिनर यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कर्मचारी सेंट पॉल्स कॅथेड्रल, लंडन ब्रिज, बिग बेन, बकिंगहॅम पॅलेस, पिकॅडिली सर्कस, ट्राफल्गर स्क्वेअर आणि मॅडम तुसाद यांसारख्या प्रसिद्ध ठिकाणांनाही भेट देतील. सहलीचा शेवट थेम्स नदीवरील सुंदर क्रूजने होईल, ज्यातून लंडनचे मनमोहक दृश्य पाहता येईल आणि हा अविस्मरणीय अनुभव पूर्ण होईल.
ही सहल अविस्मरणीय बनवण्यासाठी एक समर्पित टीम अनेक महिन्यांपासून काम करत होती. त्यांनी प्रमुख एअरलाइन्ससोबत भागीदारी करून आणि प्रत्येक ठिकाण काळजीपूर्वक निवडून, हे सुनिश्चित केले की कर्मचारी कोणत्याही पदाचा किंवा अनुभवाचा असला तरीही एकत्र प्रवास करतील, एकत्र राहतील आणि संपूर्ण सहलीत तितकाच उत्कृष्ट अनुभव घेतील.
श्री अरुण एमएन, फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर, कॅसाग्रँड आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, “दरवर्षी जेव्हा आपण आपल्या कर्मचाऱ्यांचा अशा खास पद्धतीने सन्मान करतो, तेव्हा कॅसाग्रँडची खरी ओळख अधोरेखित होते. आमचे कर्मचारी हेच आमच्या संस्थेचा आत्मा आहेत, आणि त्यांचा आनंद, आनंदाश्रू आणि भावनिक क्षण पाहून आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो. आम्ही संपत्ती वाटण्यावर विश्वास ठेवतो, आणि आमच्या कर्मचाऱ्यांपैकी अनेकजण पहिल्यांदाच परदेशात प्रवास करताना पाहणे ही आमच्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. अनेक जण पुन्हा हा आनंद घेत आहेत. आपले स्वप्न पूर्ण करताना, आठवणी तयार करताना आणि नवीन उर्जेसह परतताना पाहणे ही या परंपरेची सर्वात आनंददायक गोष्ट आहे.”
कॅसाग्रँडने वर्षानुवर्षे कर्मचाऱ्यांना प्रथम स्थान देणारी संस्कृती तयार केली आहे, जिथे प्रशंसा, सामायिक यश आणि दीर्घकाळ चालणाऱ्या प्रॉफिट-शेअर कार्यक्रम यावर भर दिला जातो. दहा वर्षांपूर्वी कठोर मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी सुरू झालेला साधा उपक्रम आता देशातील सर्वात प्रशंसित कर्मचारी सन्मान उपक्रमांपैकी ए
क बनला


