Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यातील विबग्योर स्कुल्सच्या सर्व कॅम्पसेसमध्ये 8वा स्कुल सिनेमा इंटरनॅशनल स्कुल फेस्टिव्हल (एससीआयएफएफ)...

पुण्यातील विबग्योर स्कुल्सच्या सर्व कॅम्पसेसमध्ये 8वा स्कुल सिनेमा इंटरनॅशनल स्कुल फेस्टिव्हल (एससीआयएफएफ) 2025 उत्साहात संपन्न

पुणे,27 नोव्हेंबर 2025 : विबग्योर स्कुल्स तर्फे नुकतेच पुण्यातील कॅम्पसेसमध्ये आठव्या स्कुल सिनेमा इंटरनॅशनल स्कुल फेस्टिव्हल (एससीआयएफएफ) 2025 चे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये एनआयबीएम,वाघोली,पिंपरी-चिंचवड,फुरसुंगी या कॅम्पसेसचा समावेश होता.तसेच नाशिकमधील कॅम्पसमध्ये देखील याचे आयोजन करण्यात आले होते.हा महोत्सव सर्जनशीलता,सांस्कृतिक आणि चित्रपटांद्वारे अर्थपूर्ण शिक्षणाचा उत्सव साजरा करणारा ठरला.उदय कुलकर्णी,लक्षित छाब्रा,स्वाती फातीम आणि कविता राऊत यासारख्या मान्यवरांच्या उपस्थितीने महोत्सवाची सुरूवात झाली.त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला,त्यांच्या सर्जनशील प्रवासाबाबत सांगितले आणि चित्रपट हा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन व जीवनाचा आरसा म्हणून पाहण्यास प्रोत्साहित केले.

 

उद्घाटन समारंभात विद्यार्थ्यांचे सादरीकरण झाले, त्यानंतर आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या मालिकेतील पहिल्या स्क्रीनिंगचा समावेश होता. एलएक्सएल फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात २५ देशांमधील १०० हून अधिक बालचित्रपटांच्या विचारपूर्वक निवडीद्वारे तरुण प्रतिभा आणि जागतिक कथाकथनाचा (ग्लोबल स्टोरीटेलिंग) उत्सव साजरा केला जातो.

 

या वर्षीच्या महोत्सवात विविध शैलींचे प्रदर्शन करण्यात आले – ज्यामध्ये अॅनिमेशन, लाईव्ह-अ‍ॅक्शन आणि डॉक्युमेंटरी चित्रपटांचा समावेश होता, तसेच स्कूल सिनेमा उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लघुपटांचा समावेश होता. स्क्रीनिंगचे चार वयोगटात वर्गीकरण करण्यात आले होते,यामध्ये ७ वर्षाखालील, ७+, १०+ आणि १३+ वर्षे, जेणेकरून प्रत्येक मूल त्यांच्या शिक्षणाच्या टप्प्याशी संबंधित कथांशी जोडले जाईल याची खात्री होईल. इयत्ता ५ वी पर्यंतचे चित्रपट इंग्रजी किंवा नॉनवर्बल स्वरूपात सादर करण्यात आले, तर इयत्ता ६ वी नंतरचे चित्रपट त्यांच्या मूळ भाषांमध्ये इंग्रजी उपशीर्षकांसह प्रदर्शित करण्यात आले.

 

विबग्योर स्कुल्सच्या उपाध्यक्ष कविता केरावाला म्हणाल्या की,शिक्षणाने तरूण मनांना गुंतवून ठेवले पाहिजे व त्याचबरोबर करूणा,कुतूहल आणि सर्जनशीलता जोपासली पाहिजे. एलएक्सएल फाऊंडेशन बरोबरची आमची भागीदारी विद्यार्थ्यांना नवीन दृष्टीकोन शोधण्याची आणि प्रेरणा देणाऱ्या कथांशी जोडण्याची संधी देते.एससीआयएफएफ हे समग्र शिक्षण आणि भावनिक विकासासाठी आमची वचनबध्दता प्रतिबिंबित करते.हे एनईपी 2020 च्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे,जे शिक्षण आणि सर्जनशील अभिव्यक्तीसाठी शक्तीशाली उत्प्रेरक म्हणून चित्रपट आणि माध्यमांचा वापर करण्यास प्रोत्साहन देते.

 

एलएक्सएल आयडीयाजचे व्यवस्थापकीय संचालक सईद सुलतान अहमद म्हणाले की,एससीआयएफएफ मध्ये आमचे ध्येय चित्रपटाच्या भाषेद्वारे शिक्षणाला अर्थपूर्ण व मनोरंजक बनविणे आहे.चित्रपट अध्यापन शास्त्रातील प्रणेते म्हणून आमचा ठाम विश्वास आहे की,चित्रपट हे विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल,करूणा आणि चिंतन निर्माण करण्यासाठी एक शक्तीशाली साधन आहे.हा महोत्सव मुलांना जागतिक भाषा,वैविध्यपूर्ण संस्कृती आणि शक्तीशाली कथांच्या जगाशी जोडण्याचा आणि समग्र शिक्षणाचा अनुभव देण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

 

सिनेमाद्वारे शिक्षणाच्या या तत्त्वावर आधारित एससीआयएफएफ 2025 ला अनेस्सी (फ्रान्स), ॲनिमेला (भारत),गीफोनी (इटली) आणि जीरो प्लस (रशिया) यांचे समर्थन लाभले असून 40,000 हून अधिक सरकारी शाळा आणि 1000 खासगी शाळांपर्यंत पोहचण्यासाठी सज्ज आहे.फ्रान्स,स्पेन,जर्मनी,युएई,रशिया आणि किर्गिस्तान सारख्या देशांमधील चित्रपटांसह,या महोत्सवाने भारतातील तरुण प्रेक्षकांपर्यंत विविध जागतिक कथा पोहचविल्या आहेत.

 

22 विबग्योर कॅम्पसेसमध्ये या महोत्सवाची सांगता होत असताना चित्रपटांचे प्रदर्शन व संवादांमुळे विद्यार्थ्यांमध्ये माहिती देणाऱ्या,प्रेरणा देणाऱ्या आणि विश्वदृष्टीचा विस्तार करणाऱ्या कथांबद्दल अधिकाधिक रस निर्माण झाला आहे.हे सर्व कॅम्पसेस या महोत्सवादरम्यान चिंतन आणि सर्जनशील संवादासाठी जागा बनल्या व येथे विद्यार्थी वर्गापलीकडे जाणाऱ्या कल्पनांशी जोडले

गेले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments