पुणे : लहान मुलांना अवकाश विज्ञानाची गोडी लागावी आणि त्यांना तारांगणाच्या माध्यमातून विश्वाची अनुभूती यावी, या उदात्त हेतूने ‘स्कायरीच तारांगण’ चे उद्घाटन कर्वेनगर येथील सम्राट अशोक विद्यालयात झाले. तब्बल तीस मिनिटांच्या अंतराळ सफरीमध्ये सूर्यमाला, चंद्राच्या अवस्था, ताऱ्यांचे जीवनचक्र, ग्रह, आकाशगंगा बघत बाल वैज्ञानिकांनी अंतराळाची अनोखी सफर केली.
स्कायरीच प्लॅनेटोरियम च्या वतीने साकारलेल्या पोर्टेबल डिजिटल प्लॅनिटोरियम चे उद्घाटन डीआरडीओचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. काशिनाथ देवधर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. प्रसाद खंडागळे, पांडुरंग मुकडे, सम्राट अशोक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गौरी ठाकूर, ग्लोबल मिशन ऍस्ट्रॉनॉमीचे प्रा. विशाल कुंभारे, हेन्कल कंपनीच्या मनाली भोसले, तनु जाधव, समीक्षा आगळे, आशिष गायकवाड, भारतीय युवक कल्याण व व्यायाम केंद्राचे रवींद्र ननवरे, श्रमिक फाउंडेशनचे संतोष वरक, स्थानिक स्वराज्य संघाचे अमित शिंदे, मीना मोरे, सागर फाटक आदी उपस्थित होते.
डॉ. काशिनाथ देवधर म्हणाले, आकाशगंगा, ग्रह, तारे याविषयी सखोल डिजिटल स्वरूपात मिळण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत उत्तम आहे. जुन्या काळी शास्त्रज्ञांनी शून्यातून सुरुवात केली होती. मात्र, आज अवकाश क्षेत्रात भारत जगभरात पुढे आहे. प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचे काम देशात सुरु असून या क्षेत्रात देखील भारत आणखी पुढे जायला हवा. विज्ञानाचे ज्ञान शहरापुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागात देखील पोहोचायला हवे.
महानगरपालिकेच्या विविध शाळांमधून आलेल्या सुमारे १५०० विद्यार्थ्यांनी स्कायरीच तारांगणाची सफर करीत अवकाशातील ग्रह-तारे, नक्षत्र यांचा थरारक अनुभव घेतला. याप्रसंगी विजय खळदकर, महेश पवळे, अनंत तांबे, संगीता बराटे, बाबा धुमाळ, आनंद पाटील, प्रणव थोरात, विष्णुपंत सरगर, विनोद मोहिते, प्रियंका भिसे, प्रशांत हरसुले, रमेश पायगुडे, विठ्ठल कडू यांसारख्या मान्यवरांनी देखील उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास माने यांनी तर आभार अडसूळ सर यांनी मानले.


