Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाराष्‍ट्रातील विद्यार्थ्‍यांनी एआयचा वापर करत तळागाळातील खेळाडूंसाठी टेनिस प्रशिक्षणाचे लोकशाहीकरण केले

महाराष्‍ट्रातील विद्यार्थ्‍यांनी एआयचा वापर करत तळागाळातील खेळाडूंसाठी टेनिस प्रशिक्षणाचे लोकशाहीकरण केले

भारतात लवकरच टेनिस प्रशिक्षण अधिक उपलब्‍ध होणार आहे, ज्‍याचे श्रेय दोन तरूण खेळाडूंना जाते. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत मोठ्या शहरांपलीकडे प्रशिक्षण उपलब्‍ध असण्‍यामधील तफावत दूर करत आहेत.

 

औरंगाबादमधील आदिश शेळके आणि मुंबईमधील भाग्‍यश्री मीना हे दोघेही २१ वर्षीय टेनिस खेळाडू आणि आयआयटी पुणे येथे कम्‍प्‍युटर सायन्‍सचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. या दोघांनी नेक्‍स्‍टप्‍लेएआय प्‍लॅटफॉर्म डिझाइन केला आहे, जे मशिन लर्निंगचा उपयोग करत टेनिस व्हिडिओजचे विश्‍लेषण करते, ज्‍यामधून स्‍ट्रोक्‍स, फूटवर्क आणि सामन्‍यामधील मूव्‍हमेंट्सबाबत वैयक्तिकृत अभिप्राय मिळतात. यामागे द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमधील उदयोन्‍मुख टेनिस खेळाडूंना मार्गदर्शन उपलब्‍ध करून देण्‍याचा मनसुबा आहे, जे सामान्‍यत: महागड्या शैक्षणिक संस्‍थांमध्‍ये व उच्‍च प्रशिक्षकांकडून मिळते.

 

या दोघांच्‍या नाविन्‍यतेला क्रीडा व तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून सामाजिक बदल या श्रेणीअंतर्गत सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो अनुदान मिळाले. हा प्‍लॅटफॉर्म सॅमसंगच्‍या प्रमुख शैक्षणिक उपक्रमाचा भाग आहे, जो वास्‍तविक विश्वातील आव्‍हानांसाठी तरूणांनी डिझाइन केलेल्‍या तंत्रज्ञान सोल्‍यूशन्‍सना पाठिंबा देतो. यंदा, चार विजेत्‍या टीम्‍सना त्‍यांच्‍या संकल्‍पनांना अधिक निपुण करण्‍यासाठी आयआयटी दिल्‍ली येथे १ कोटी रूपयांचा इन्‍क्‍यूबेशन सपोर्ट मिळाला.

 

शेळके म्‍हणाला की टेनिस प्रशिक्षण फक्‍त काही शहरी भागांमध्‍ये दिले जाते या वास्‍तविकतेमधून ही संकल्‍पना उदयास आली. ”टेनिस प्रशिक्षण अनेकदा लक्‍झरीसारखे वाटते,” असे तो म्‍हणाला. ”औरंगाबाद सारख्‍या शहरामध्‍ये उच्‍च दर्जाच्‍या पायाभूत सुविधा आणि तज्ञ प्रशिक्षण अत्‍यंत मर्यादित आहे. अनेक उदयोन्‍मुख खेळाडूंना योग्‍य वेळी दर्जेदार प्रशिक्षण मिळत नसल्‍यामुळे टेनिस खेळ सोडून देतात.”

 

नेक्‍स्‍टप्‍लेएआय खेळाडूंना त्‍यांची सराव सत्रे रेकॉर्ड करण्‍यास मदत करते, ज्‍यामुळे ते सर्व्‍ह मेकॅनिक्‍स, रॅकॅट अँगल्‍स आणि टेनिस कोर्टवरील हालचाली अशा अनेक बाबींची प्रोफेशनल खेळाडूंच्‍या खेळासोबत तुलना करू शकतात. मीना म्‍हणाली की, टेनिस प्रशिक्षण किफायतशीर व सहजसाध्य करण्‍याचे ध्‍येय आहे. ”उत्तम खेळाडूंबाबत बरेच बहुमूल्‍य फूटेज व डेटा उपलब्‍ध आहे. आमची सर्वत्र, विशेषत: मोठ्या महानगरांबाहेरील तरूण खेळाडूंना अशा उत्तम खेळाडूंच्‍या कौशल्‍याचा अनुभव देण्‍याची महत्त्वाकांक्षा होती,” असे ती म्‍हणाली.

 

सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोकडून मिळालेल्‍या मार्गदर्शनांतर्गत टीमने आपला दृष्टिकोन अधिक निपुण करत डिझाइनबाबत सखोल विचार केला, तसेच डिझाइन करण्‍यात येणारे टूल विविध प्रशिक्षण शैलींशी जुळले जाण्‍याची खात्री घेतली. ”प्रत्‍येक टेनिस खेळाडूचे अद्वितीय तंत्र व डावपेच असतात,” असे शेळके म्‍हणाला. ”एआयने एकसारखेपणा न आणता प्रत्‍येक टेनिस खेळाडूच्‍या विशिष्‍ट शैलीला ओळखले पाहिजे.”

 

या दोघांची आता विशिष्‍ट क्रीडा संस्‍था आणि टेनिस अकॅडेमिक्‍ससोबत सहयोग करण्‍याची योजना आहे, ज्‍यामुळे लहान शहरांमध्‍ये अधिकाधिक प्रमाणात प्‍लॅटफॉर्म्स उपलब्‍ध होईल. तसेच, त्‍यांनी याच पार्श्वभूमीमधील डेव्‍हलपर्स व खेळाडूंची टीम तयार करण्‍याची देखील महत्त्वाकांक्षा आहे, ज्‍यांना मोठ्या शहरांबाहेर टेनिस प्रशिक्षण देण्‍याबाबत प्रत्‍यक्ष आव्‍हाने माहित आहेत.

 

”आम्‍हाला लोकांना अपेक्षित नसलेल्‍या ठिकाणांमधून अधिकाधिक टेनिस चॅम्पियन्‍स उदयास येताना पाहायचे आहे,” असे मीना म्‍हणाली. ”टॅलेट सर्वत्र आहे, तर मग संधी देखील सर्वत्र उपलब्‍ध असायला पाहिजेत.”

 

भारत क्रिकेट व्‍यतिरिक्‍त मोठ्या प्रमाणात क्रीडा संस्‍कृती निर्माण करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत असताना यांसारख्‍या नाविन्‍यतांचा भावी टेनिस सितारे दर्जेदार टेनिस प्रशिक्षण न मिळाल्‍याने मागे न राहण्‍याची खात्री घेण्‍याचा मनसुबा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments