Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १ नोव्हेंबरपुर्वी दाखल प्रकरणावर कार्यवाही करण्यात येणार -जिल्हा विधी...

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १ नोव्हेंबरपुर्वी दाखल प्रकरणावर कार्यवाही करण्यात येणार -जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

पुणे, दि. ३० : आगामी राष्ट्रीय लोकअदालत होणाऱ्या १३ डिसेंबर २०२५ रोजी न्यायालयामध्ये होणारी संभाव्य गर्दी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्याकरीता १ नोव्हेंबर २०२५ रोजी पुर्वी न्यायालयात दाखल असलेल्या ज्या प्रकरणांमध्ये लोकअदालतीची नोटीस काढण्यात आली आहे, केवळ अशीच प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेली आहेत.

 

 

 

इतर सर्व नागरिकांना व वाहनधारकांना सुचित करण्यात येते की, इतर कोणाचीही मोटार वाहन प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यात आलेली नाहीत. तसेच ज्यांना १३ सप्टेंबर २०२५ रोजीच्या लोकअदालतीच्या दिवशी टोकन मिळाली आहेत त्यांची देखील प्रकरणे या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेली नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, पुणे शहर वाहतुक विभाग, पिंपरी-चिंचवड वाहतुक विभाग तसेच महामार्ग वाहतूक विभाग पुणेयांच्यातर्फे करण्यात येत आहे.

 

00000

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments