Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedविद्या वायर्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री बुधवार 3 डिसेंबर 2025 पासून होणार...

विद्या वायर्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री बुधवार 3 डिसेंबर 2025 पासून होणार सुरू

प्रति इक्विटी शेअर 48 रुपये ते 52 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.

इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 48 पट फ्लोअर किंमत आणि 52 पट कॅप किंमत

बोली/ऑफर 3 डिसेंबर 2025 रोजी खुली होईल आणि 5 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल (“Bid Dates”).

अँकर गुंतवणूकदारांच्या बोलीचा दिनांक 02 डिसेंबर 2025 आहे.

बोली किमान 288 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 288 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल (“No. of Bids”)

रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (“RHP”) लिंक: https://pantomath-web.s3.ap-south-1.amazonaws.com/1764307408438-VidyaWiresLimited-RHP.pdf

 

राष्ट्रीय, 29 नोव्हेंबर 2025: विद्या वायर्स लिमिटेड (“कंपनी”)ने इक्विटी शेअरसाठी 3 डिसेंबर 2025 पासून प्राथमिक समभाग विक्रीसाठी बोली/ऑफर खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

 

प्रति इक्विटी शेअर 48 रुपये ते 52 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा (“Price Band”) निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 288 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 288 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.

 

प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये (“Total Offer Size”) 2,740 दशलक्ष रु. (274 कोटी रु.) पर्यंतचे फ्रेश इश्यू (“Fresh Issue”) आणि ऑफर फॉर सेल अंतर्गत एकूण 5,001,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (“Offer for Sale”) समाविष्ट आहेत.

 

अँकर गुंतवणूकदारांच्या बोलीचा दिनांक 2 डिसेंबर 2025 आहे. बोली/ऑफर 3 डिसेंबर 2025 रोजी खुली होईल आणि 5 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल.

 

कंपनीने फ्रेश इश्यू मधून प्राप्त होणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग पुढीलप्रमाणे करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे: (i) उपकंपनी एएलसीयू मध्ये नवीन प्रकल्प उभारण्यासाठी लागणाऱ्या भांडवली खर्चाच्या गरजा भागविण्यासाठी 1,400 दशलक्ष रु. [140 कोटी रु.];

(ii) कंपनीने घेतलेल्या काही किंवा सर्व प्रलंबित कर्जांची पूर्ण किंवा आंशिक परतफेड/पूर्व-परतफेड करण्यासाठी अंदाजे 1,000 दशलक्ष रु. [100 कोटी रु.]; तसेच

सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टासाठी.

 

कंपनीचे रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस द्वारे हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE” आणि BSE बरोबर एकत्रितपणे “Stock Exchanges”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. ऑफरच्या उद्दिष्टासाठी BSE हे निर्देशित स्टॉक एक्सचेंज राहील.

 

पँटोमॅथ कॅपिटल ॲडव्हायर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.

 

येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.

 

ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या 50% पेक्षा जास्त नसलेला भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा अँकर गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. अँकर गुंतवणूकदारांसाठीच्या 40.00% भागामधून 33.33% हा फक्त देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी राखीव असेल आणि 6.67% हा जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंडसाठी राखीव असेल. त्यासाठी अँकर गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील (“Anchor Investor Allocation Price”).

 

जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंडसाठी राखीव केलेल्या श्रेणीत कमी सदस्यता (under-subscription) झाल्यास, न वाटप झालेला हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंडांना वाटप केला जाऊ शकतो. अँकर गुंतवणूकदारांसाठीचा हिस्सा मध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास उर्वरित इक्विटी शेअर्स हे उरलेल्या QIB Portion मध्ये (प्रमुख गुंतवणूकदारांसाठीचा हिस्सा वगळून) (“Net QIB Portion”) समाविष्ट केले जातील.

 

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (अँकर गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. पुढे, नेट ऑफर पैकी 15% पेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“Non-Institutional Category”) उपलब्ध असेल. बिगर संस्थात्मक भागापैकी एक तृतीयांश भाग 0.20 दशलक्ष रु. पेक्षा जास्त आणि 1.00 दशलक्ष रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग 1.00 दशलक्ष रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वाटप केला जाऊ शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल.

 

तसेच, ऑफरच्या 35% पेक्षा कमी नसलेला हिस्सा रिटेल वैयक्तिक गुंतवणुकदार (“Retail Category”) यांच्या साठी उपलब्ध राहील. SEBI ICDR नियमनानुसार ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. अँकर गुंतवणूकदारांखेरीज (except Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.

 

तपशीलांसाठी, पृष्ठ 421 वरील “Offer Procedure (ऑफर प्रोस्युजर)” या शीर्षकाखालील विभाग पहा.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments