Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedटोयोटा किर्लोस्कर मोटरची नोव्हेंबर 2025 मध्ये ३३,७५२ वाहन विक्री वार्षिक आधारावर २८...

टोयोटा किर्लोस्कर मोटरची नोव्हेंबर 2025 मध्ये ३३,७५२ वाहन विक्री वार्षिक आधारावर २८ टक्के वाढ

बेंगळुरू, ०१ डिसेंबर २०२५ : टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) आज नोव्हेंबर २०२५ मधील विक्रीचा अहवाल जाहीर केला असून एकूण ३३,७५२ युनिट्सची विक्री नोंदवली आहे. यामध्ये ३०,०८५ युनिट्सची देशांतर्गत विक्री तर ३,६६७ युनिट्सची निर्यात करण्यात आल्याचे कंपनीने अधिकृतपणे नमूद केले.

 

यासंदर्भात कंपनीच्या सेल्स–सर्व्हिस–युज्ड कार बिझनेस विभागाचे उपाध्यक्ष वरिंदर वाधवा म्हणाले, सरकारच्या प्रगतिशील जीएसटी सुधारणा आणि सकारात्मक सणासुदीच्या हंगामामुळे आम्हाला 28% वाढीसह मजबूत गती अनुभवायला मिळाली आहे. अर्बन क्रूझर हायरायडर एरो एडिशन आणि फॉर्च्युनर लीडर एडिशनच्या अलीकडील लाँचमुळे आमच्या वाढीच्या दिशेने आणखी बळ मिळाले आहे आणि देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘ड्रम ताओ’ सारखे अभिनव उपक्रम आणि बेंगळुरूमध्ये सुरू केलेल्या टोयोटा एक्स्पिरिएन्शियल म्युझियम (TEM) ला मोठी प्रशंसा मिळाली आहे, ज्यामुळे ग्राहकांशी नाते अधिक दृढ झाले आहे.”

 

 

वर्ष-वर्ष तुलना: [नोव्हेंबर 2025 VS नोव्हेंबर 2024]

 

कालावधी

 

नोव्हेंबर 2025

 

नोव्हेंबर 2024

 

वाढ

 

Y-o-Y

 

33,752 युनिट्स

 

2

6,323 युनिट्स

 

28%

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments