Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedविमानतळ वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीसंदर्भातील अंतिम आदेश जारी

विमानतळ वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीसंदर्भातील अंतिम आदेश जारी

 

 

 

 

पुणे दि. 1: पुणे शहरातील विमानतळ वाहतूक विभागांतर्गत हिंमत जाधव पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर यांनी मोटार वाहन कायदा कलम 115, 116(1)(ए)(बी), 116(4) व 117 अन्वये अत्यावश्यक सेवेतील वाहने फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ. यांना वगळता वाहतुकीसाठी खालील अंतिम नियम लागून रहातील.

 

एकेरी वाहतूक घोषित रस्ते श्रीकृष्ण हॉटेल चौक → दत्तमंदिर चौक → सीसीडी चौक – गंगापुरम चौक → कैलास सुपर मार्केट चौक → गणपती मंदिर चौक तर दुतर्फा वाहतूक सुरू राहणारे मार्ग सीसीडी चौक → गंगापुरम चौक, दत्तमंदिर चौक → कैलास सुपर मार्केट चौक, गणपती मंदिर चौक → श्रीकृष्ण हॉटेल चौक.

 

याआधी सदर मार्गावर अस्तित्त्वात असलेले सर्व निर्बंध रद्द करण्यात आले असून शहरातील वाहतुकीची शिस्त, सुरक्षितता व सुगमता राखण्यासाठी नागरिकांनी नव्या वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन हिंमत जाधव, पोलीस उपआयुक्त यांनी केले आहे.

 

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments