Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedअ‍ॅक्सिस मॅक्स लाईफच्या ई-कॉमर्स चॅनेलकडून आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या सहामाहीत एपीईवर...

अ‍ॅक्सिस मॅक्स लाईफच्या ई-कॉमर्स चॅनेलकडून आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या सहामाहीत एपीईवर ५२% दोन वर्षांचा सीएजीआर साध्य; ऑनलाइन संरक्षण आणि बचत बाजारपेठेतील कंपन्यांपैकी एक

 

 

 

नवी दिल्ली, २ डिसेंबर २०२५: अ‍ॅक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स लिमिटेड (“अ‍ॅक्सिस मॅक्स लाईफ” / “कंपनी”), पूर्वीची मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड असलेल्या या कंपनीने ई-वाणिज्य माध्यमातून मिळवलेल्या व्यवसायासाठी आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या सहामाहीत ५२% दोन वर्षांचा चक्रवाढ वार्षिक वाढ दर (“सीएजीआर”) नोंदवला आहे. या वाढीमुळे उत्साहित झालेले अ‍ॅक्सिस मॅक्स लाईफचे ई-कॉमर्स चॅनेल आता उद्योगातील ऑनलाइन संरक्षण आणि बचत बाजारपेठेत एक आघाडीची कंपनी ठरली आहे.

 

मागील तीन वर्षांत अ‍ॅक्सिस मॅक्स लाईफचे ई-कॉमर्स चॅनेल कंपनीसाठी पॉलिसी विक्रीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनले असून त्यातून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ३१% पेक्षा जास्त आणि आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीतील खरेदी केलेल्या सर्व नवीन पॉलिसींपैकी ३५% पॉलिसी विकल्या गेल्या आहेत. या उत्तम कामगिरीमुळे अ‍ॅक्सिस मॅक्स लाईफचे ऑनलाइन विमा बाजारपेठेत एक आघाडीची कंपनी म्हणून स्थान मजबूत झाले आहे, त्यामुळे बाजारपेठेतील तिचा वाटा लक्षणीय आहे. कंपनीच्या डायरेक्ट-टू-कंझ्युमर (स्वतःच्या वेबसाइटद्वारे) चॅनेलने या कालावधीत आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत २१९ कोटी रूपये वार्षिक अधिमूल्य समतुल्यसह (“एपीई”) आपला विकास कायम ठेवला असून त्यात ५२% वार्षिक दराने वाढ होत आहे. अ‍ॅक्सिस मॅक्स लाईफचे ई-कॉमर्स चॅनेल शाश्वत फायदा देणाऱ्या मुख्य डिजिटल क्षमतांवर आपल्या योजना आखून वाढीला गती देत आहे. कंपनीने एक मजबूत परफॉर्मन्स मार्केटिंग आणि विश्लेषण इंजिन तयार केले आहे. तसेच ग्राहकांसाठी पूर्व-मंजूर तीन-क्लिक डीआयवाय आंतरविक्री आणि प्रगतीसाठी माध्यम आणली आहेत. तसेच नियंत्रित क्रेडिट ब्युरो आणि खाते-एकत्रीकरण परिसंस्थेद्वारे अखंड ग्राहक ऑनबोर्डिंग सक्षम केले आहे.

 

अ‍ॅक्सिस मॅक्स लाईफचे ई-कॉमर्स चॅनेल विक्री आणि ग्राहकांची पसंती समजून घेण्यासाठी एआयवर आधारित व्हॉइस-टू-टेक्स्ट प्लॅटफॉर्मचा वापर करते. ते एका एकत्रित प्रयोग इंजिनाच्या माध्यमातून चालते आणि ई-कॉमर्स चॅनेलवर ए/बी चाचणी शक्य करते. या क्षमतांमुळे विक्री सहजशक्य होते, अनुभव समृद्ध होतात आणि ग्राहकांसाठी डेटावर आधारित शिस्तीसह उत्तम कामगिरीची खात्री मिळते.

 

अ‍ॅक्सिस मॅक्स लाईफचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित मदन म्हणाले, “गेल्या काही वर्षांत ई-कॉमर्स चॅनेलमधील आमची लक्षणीय वाढ आमच्या डिजिटल वर्चस्वाची खात्री तसेच आमच्या ऑनलाइन उत्पादनांमवर ग्राहकांनी ठेवलेल्या विश्वासाचे प्रमाण आहे. ऑनलाइन संरक्षण आणि बचत या दोन्ही विभागातील आमचे आघाडीचे स्थान हे एक उत्तम ग्राहकानुभव देण्यावर आमचे लक्ष केंद्रित करण्याचा थेट परिणाम आहे. त्यामुळे आमची उत्पादने नवीन काळातील ग्राहकांच्या विकसित गरजा पूर्ण करतात याची खात्री होते. विश्वास आणि नावीन्यपूर्णतेसह आम्ही प्रत्येक ग्राहकासाठी विमा सोपा, स्मार्ट आणि अधिक सुलभ बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

 

सर्वोत्तम उत्पादने आणि एकसंध डिजिटल अनुभव निर्माण करण्यावर अ‍ॅक्सिस मॅक्स लाईफचे अथक लक्ष या यशामागील प्रेरक आहेत. त्यामुळे कंपनीला एकूण ई-वाणिज्य माध्यमात आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यास मदत झाली आहे. अ‍ॅक्सिस मॅक्स लाईफ आपल्या ई-वाणिज्य चॅनेलच्या वाढीचे श्रेय शाश्वत उत्पादन नवसंशोधन, आघाडीच्या ऑनलाइन वितरकांसोबत मजबूत भागीदारी आणि एंड-टू-एंड ग्राहक अनुभव मजबूत करणाऱ्या डिजिटल उपक्रमांना देते. यात ग्राहकांना शोधण्यापासून खरेदीपर्यंत स्पष्टता आणि सुयोग्य मार्गदर्शन करणारा संरचित खरेदी प्रवास डिझाइन करणे आणि निर्णय घेण्यास समर्थन देण्यासाठी चॅनेलवर वेळेवर, वैयक्तिकृत संदेश वितरित करणारे विक्री साधन समाविष्ट आहे. कंपनीने वैयक्तिकृत, ऑन-मोबाइल खरेदीदेखील येथे शक्य आहे. त्यामुळे उत्पादने सहजपणे समजून घेता येतात आणि सातत्यपूर्ण थेट व्यवसाय वाढीचा आधारस्तंभ असलेल्या डिजिटल मार्केटिंगसाठीही हे सोपे झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments