Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवी मुंबई: अनुकरणीय आनंद मेळावा

नवी मुंबई: अनुकरणीय आनंद मेळावा

 

 

नवी मुंबई येथील सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने नेहमीप्रमाणे महिन्याच्या शेवटच्या दिवशी, अर्थात ३० नोव्हेंबर २०२५ रोजी ५१ ज्येष्ठ नागरिक सभासदांचे वाढदिवस पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन साजरे करण्यात आले.

 

यावेळच्या आनंद मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रसार माध्यमातील राष्ट्रीय स्तरावरच्या रापा पुरस्कार विजेत्या आणि आंतरराष्ट्रीय न्यूज स्टोरी टुडे पोर्टलच्या निर्मात्या सौ. अलका भुजबळ यांचा, संघाचे जेष्ठ सदस्य श्री उत्तम चव्हाण यांच्या अपघात प्रसंगी मदत करणाऱ्या सौ अश्विनी संदेश मोरे आणि श्री लक्ष्मीकांत कोळपकर यांचा, संघाचे फलक सुंदर अक्षराने लिहिणारे नारायण साखरे यांचाही माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, कोमल वास्कर, समाजसेवक अविनाश जाधव, प्रियंका जाधव यांच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

 

संघाचे सचिव जगदीश एकावडे आणि शरद पाटील यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी संघाचे नवनियुक्त अध्यक्ष श्री मारुती विश्वासराव यानी भविष्यात होणाऱ्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. वाढदिवसाच्या मानकरी असणाऱ्यांचे निवेदन संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे यांनी केले. देणगीदारांची नावे संघाचे खजिनदार महादेव पाटील यांनी वाचली. तर आभार संघाच्या उपाध्यक्षा सौ. सीमा बोराडे यांनी मानले.

 

ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते पत्की आणि इतर सभासदांनी वाढदिवसाचे सामूहिक गाणे गायले. शेवटी ज्येष्ठ नागरिकांना स्नॅक्स वाटप करून आनंद मेळाव्याची सांगता झाली.या मेळाव्यास संघाचे आजी, माजी पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments