वेकफिट इनोव्हेशन्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री सोमवार 8 डिसेंबर 2025 पासून होणार सुरू
2 डिसेंबर 2025: वेकफिट इनोव्हेशन्स लिमिटेड (“कंपनी”)ने प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्ससाठीची (“Equity Shares”) प्राथमिक समभाग विक्री (“Offer”) सोमवार 8 डिसेंबर 2025 पासून खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक बोली/ऑफर खुली होण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजे शुक्रवार 5 डिसेंबर 2025 आहे. बोली/ऑफर बुधवार 10 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल.
प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअर 185 रुपये ते प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअर 195 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या किमान 76 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 76 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
प्राथमिक समभाग विक्री मध्ये 3,771.78 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि विक्री समभागधारकांकडून 46,754,405 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. यामध्ये अंकित गर्ग यांच्याकडून 7,729,488 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि चैतन्य रामलिंगेगौडा यांच्याकडून 4,452,185 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (एकत्रितपणे “प्रवर्तक विक्री समभागधारक”) आहेत. तसेच नितिका गोएल यांच्याकडून 899,205 पर्यंतचे इक्विटी शेअर्सपर्यंत, पीक XV पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट्स VI कडून 20,374,774 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, रेडवुड ट्रस्ट कडून 138,047 पर्यंतचे इक्विटी शेअर्सपर्यंत, वर्लिनव्हेस्ट S.A. कडून 10,193,506 पर्यंतचे इक्विटी शेअर्सपर्यंत, एसएआय ग्लोबल इंडिया फंड I, LLP कडून 413,150 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि पॅरामार्क KB फंड I कडून 2,554,050 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (संयुक्तरित्या “इतर विक्री समभागधारक”) यांचा समावेश आहे.
कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE” आणि BSE बरोबर एकत्रितपणे “Stock Exchanges”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.
ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड आणि नोमूरा फायनान्शियल अॅडव्हायजरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.


