Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोरोना रेमिडीज लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री सोमवार 08 डिसेंबर 2025 पासून होणार...

कोरोना रेमिडीज लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री सोमवार 08 डिसेंबर 2025 पासून होणार सुरू

कोरोना रेमिडीज लिमिटेडच्या प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“Equity Shares”) 1008 रु. ते 1062 रु. किंमतपट्टा निश्चित

 

· बोली/ऑफर सोमवार 08 डिसेंबर 2025 रोजी खुली होईल आणि बुधवार, 10 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक शुक्रवार 05 डिसेंबर 2025 आहे.

 

· बोली किमान 14 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 14 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

 

· कर्मचारी राखीव भागांत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 54 रु. ची सवलत

 

· रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (“RHP”) लिंक: https://live.jmfl.com/od/UploadedFiles/D85CD184-902B-431E-8620-18ABC2F68BE8.pdf

 

 

 

मुंबई, 03 डिसेंबर 2025: कोरोना रेमिडीज लिमिटेड (CRL) ने इक्विटी शेअर्ससाठी सोमवार 08 डिसेंबर 2025 पासून प्राथमिक समभाग विक्री बोली/ऑफर खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. बोली/ऑफर बुधवार, 10 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. प्रति इक्विटी शेअरसाठी 1008 रु. ते 1062 रु. किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. जे एम फायनान्शियल लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

 

 

 

प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक शुक्रवार 05 डिसेंबर 2025 आहे. बोली किमान 14 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 14 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. या ऑफरमध्ये प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त [●] इक्विटी शेअर्सचा समावेश असून त्याची एकूण रक्कम 6,553.71 दशलक्ष रु. इतकी आहे.

 

 

 

एकूण ऑफर साइजमध्ये प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सची एकूण रक्कम 6,553.71 दशलक्ष रु. इतकी असून यात खालीलप्रमाणे समावेश आहे: डॉ. कीर्तिकुमार लक्ष्मीदास मेहता (प्रवर्तक विक्री समभागधारक) यांच्याकडून प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त [●] इक्विटी शेअर्सची 1,298.41 दशलक्ष रु. इतकी रक्कम; मिनाक्षी कीर्तिकुमार मेहता (प्रमोटिंग ग्रुप विक्री समभागधारक ) यांच्याकडून प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त [●] इक्विटी शेअर्सची 766.07 दशलक्ष रु. इतकी रक्कम; दिपाबेन निरवकुमार मेहता (प्रमोटिंग ग्रुप विक्री समभागधारक) यांच्याकडून 103.87 दशलक्ष रु. पर्यंतचे प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले जास्तीत जास्त [●] पर्यंत इक्विटी शेअर्स; ब्रिंदा अंकुर मेहता (प्रमोटिंग ग्रुप विक्री समभागधारक) यांच्याकडून 103.87 दशलक्ष रु. पर्यत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त [●] पर्यंतचे इक्विटी शेअर्स; सेपिया इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड (गुंतवणुकदार विक्री समभागधारक) यांच्याकडून 4,046.00 दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले [●] पर्यंतचे इक्विटी शेअर्स; अँकर पार्टनर्स (गुंतवणुकदार विक्री समभागधारक) यांच्याकडून 151.25 दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले [●] पर्यंतचे इक्विटी शेअर्स; सेज इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (गुंतवणुकदार विक्री समभागधारक) यांच्याकडून 84.24 दशलक्ष रु पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले [●] पर्यंतचे इक्विटी शेअर्स यांचा यात समावेश आहे.

 

 

 

कर्मचारी राखीव भागांत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 54 रु. ची सवलत दिली जात आहे.

 

 

 

कंपनीचे रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (“RHP”) द्वारे हे इक्विटी शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) आणि BSE लिमिटेड (BSE आणि NSE बरोबर एकत्रितपणे “Stock Exchanges”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.

 

 

 

कोरोना रेमेडीज ही भारत-केंद्रित ब्रँडेड फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कंपनी असून महिलांच्या आरोग्य, कार्डिओ-डायबेटो, वेदना व्यवस्थापन, यूरोलॉजी आणि इतर उपचारात्मक क्षेत्रांमध्ये उत्पादनांची निर्मिती, विकास, आणि विपणन करण्याचे कार्य करते. 30 जून 2025 पर्यंत कंपनीकडे 71 ब्रँड्सचा वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ असून तो विविध उपचारात्मक क्षेत्रांना पूरक आहे.

 

 

 

CRISIL इंटेलिजन्स रिपोर्टनुसार, कोरोना रेमेडीज ही MAT जून 2024 ते MAT जून 2025 या कालावधीत भारतीय औषधनिर्माण बाजारपेठे (“IPM”) मधील आघाडीच्या 30 कंपन्यांमध्ये देशांतर्गत विक्रीच्या दृष्टीने सर्वात वेगाने वाढणारी कंपनी आहे. MAT म्हणजे चालू वर्षातील एकूण वार्षिक संख्या. MAT जून 2022 ते MAT जून 2025 या कालावधीत देशांतर्गत विक्रीच्या दृष्टीने IPM मधील अग्रणी 30 कंपन्यांमध्ये कोरोना रेमेडीज ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वेगाने वाढणारी कंपनी होती.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments