Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन अहवालाचे जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते विमोचन

पुणे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन अहवालाचे जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते विमोचन

पुणे, दि. ३ (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेला जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन तसेच शाश्वत विकास ध्येये जिल्हा प्रगतीमापन अहवाल जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले.

यावेळी प्रादेशिक सहसंचालक अर्थ व सांख्यिकी संचालनालय सुनील जाधव, उपायुक्त नियोजन संजय मरकळे, उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रियांका बोकील, तसेच जिल्हा सांख्यिकी आणि जिल्हा नियोजन समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, पुणे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन तसेच शाश्वत विकास ध्येये जिल्हा प्रगतीमापन अहवाल प्रशासनाला धोरणनिर्मितीत, विकास आराखडा तयार करतांना प्राधान्यक्रम ठरवितांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. जिल्ह्याच्या सातत्यपूर्ण व सर्वांगीण विकासासाठी अशा अभ्यासपूर्ण दस्तऐवजांची आवश्यकता आहे, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने संकलित केलेल्या आकडेवारीच्या आधारे तयार केलेला हा अहवाल जिल्ह्यातील विविध शासकीय, निम शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, संशोधक व विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल, असेही श्री. डुडी म्हणाले.

पुणे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन आणि शाश्वत विकास ध्येये जिल्हा प्रगतीमापन अहवाल पुणे जिल्ह्याच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीचे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील शाश्वत विकास ध्येये निर्देशकांच्या अनुषंगाने झालेल्या कामगिरीचे सर्वसमावेशक चित्र उभे राहते. जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन हा जिल्ह्याच्या लोकसंख्या, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, उद्योग, शेती, रोजगार यांसह विविध क्षेत्रांतील स्थितीचे प्रतिबिंब दर्शवणारा महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो.

दरम्यान, शाश्वत विकास ध्येये जिल्हा प्रगतीमापन अहवाल हा संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांनुसार निर्धारित केलेल्या निर्देशकांचे मापन करून जिल्ह्याची प्रगती, आव्हाने आणि भविष्यकालीन दिशा स्पष्ट करतो. अहवालात दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ पाणी व स्वच्छता, उद्योग व नवोन्मेष, शाश्वत शहरे, हवामान कृती इत्यादी महत्त्वाच्या ध्येयांवरील जिल्ह्याची स्थिती विषद करण्यात आली आहे.

000

00

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments