~ फुल थ्रोटल- नो ह्यूमन्स रिक्वायर्डमध्ये भागीदारीची घोषणा
~ वेगवान आता अधिक वेगवान: स्टिंग एनर्जीचा ® मर्सिडीझ एएमजी पेट्रोनास एफ१ टीमसोबत स्पीड कल्चरमध्ये दिमाखदार प्रवेश
~ मर्सिडीझ एएमजी पेट्रोनास एफ१ टीमसोबतची महत्त्वाची जागतिक भागीदारी २०२६ मध्ये सुरू होणार
स्टिंग x मर्सिडीझ एएमजी पेट्रोनास एफ१ टीम – वेगवान आता अधिक वेगवान
पेप्सिकोचे सळसळती ऊर्जा देणारे एनर्जी ड्रिंक आणि फॉर्म्युला १® चे अधिकृत टीम पार्टनर स्टिंग एनर्जी मर्सिडीज-एएमजी पेट्रोनास एफ१ टीमसोबत भागीदारी करत असून त्यांनी यशाच्या एका नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे. फॉर्म्युला १ आणि ब्रँड भागीदारी अशा दोन्हीसाठी ही पहिलीच अशी घटना असून स्टिंग एनर्जी आणि मर्सिडीज-एएमजी पेट्रोनास एफ१ टीमने कारमार्फत डिजिटल फिल्मद्वारे बातम्या पोहोचवण्याची परवानगी दिली. पोडियम नाही. स्क्रिप्ट नाही. फक्त एक अचूक-ट्यून केलेला लॅप जिथे इंजिन “स्टिंगगगगगग” अशी जोरदार गर्जना करते.
स्टिंगचा हाय व्होल्टेज नाट्यमय उपक्रम
या घोषणेत केवळ भागीदारीचीच नाही तर तर स्टिंग वीकेंड्सना असलेल्या शर्यतींमध्ये काय आणेल याचीही जोरदार घोषणा आहे. त्यात आहे अधिक ऊर्जा, अधिक वेग आणि चाहते आणि मर्सिडीज-एएमजी पेट्रोनास एफ१ टीम यांच्यातील प्रिय संबंध.
व्हिडिओ प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच आघाडीच्या क्रिएटर्सनी सोशल मीडियावर या बातम्यांबद्दल आणि कारच्या माध्यमातून तिचा कसा प्रसार केला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया अत्यंत उत्साहाने व्यक्त केल्या.
“ही भागीदारी कामगिरी, ऊर्जा आणि चव एकाच बॅनरखाली एकत्र आणेल आणि पेप्सिकोच्या तीन सर्वात प्रतिष्ठित ब्रँडना जगातील सर्वात यशस्वी फॉर्म्युला १ टीमशी जोडेल,” पेप्सिकोचे इंटरनॅशनल बेव्हरेजेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी यूजीन विलेमसेन म्हणाले. “गेटोरेड, स्टिंग आणि डोरिटोसच्या माध्यमातून आम्ही खेळाच्या संस्कृतीत आहोत आणि खेळाडू व चाहते दोघांनाही एफ१ च्या थ्रिलसाठी सज्ज करत आहोत. मर्सिडीज-एएमजी पेट्रोनास फॉर्म्युला १ टीमसोबत भागीदारी कामगिरी, नावीन्य आणि उत्कृष्टता या दोन्ही कंपन्यांचे केंद्रबिंदू असलेल्या मूल्यांबाबत आमची वचनबद्धता अधोरेखित करते.”
मर्सिडीज-एएमजी पेट्रोनास एफ१ टीमचे टीम प्रिन्सिपल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी टोटो वोल्फ म्हणाले: “पेप्सिकोसारख्या मजबूत पोर्टफोलिओ असलेल्या कंपनीचे आमच्या भागीदारी वर्तुळात आगमन हे आमच्या टीम आणि आमच्या खेळाच्या ताकदीचे आणखी एक लक्षण आहे. एक ब्रँड म्हणून ते नावीन्यपूर्णता आणि उत्कृष्टता आणून अंतिम ध्येयाचा पाठपुरावा करण्याच्या आमच्या नीतिमत्तेशी पूर्णपणे जुळतात. क्रीडा विज्ञानातील गॅटोरेडचे ज्ञान, स्टिंगची तरुण ऊर्जा आणि डोरिटोसची सांस्कृतिक प्रासंगिकता दर वेळी काहीतरी अद्वितीय आणते. ते एकत्र येऊन अशी भागीदारी तयार करतात जी केवळ आमच्या टीमच्या कामगिरीला पाठबळ देत नाही तर जगभरातील आमच्या चाहत्यांचा अनुभव समृद्ध करते.”
मर्सिडीज-एएमजी पेट्रोनास एफ१ टीमचे मुख्य व्यावसायिक अधिकारी रिचर्ड सँडर्स म्हणाले: “आम्हाला पेप्सिकोचे टीममध्ये स्वागत करताना आनंद होत आहे. या क्षेत्रातील त्यांचेज्ञान आम्हाला ट्रॅक आणि त्याहीपलीकडे आमचे पाहुणे आणि चाहत्यांसाठी उत्तम अनुभव देण्यास मदत करेल. ही अशी एक भागीदारी आहे जी आमच्या रोजच्या कामात आणि जगभरातील लोकांशी संबंधांत खऱ्या अर्थाने मूल्यवर्धन करेल.”


