आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्सने H1-FY2026 मध्ये उद्योगातील सर्वाधिक असा 99.33% क्लेम सेटलमेंट रेशो नोंदवला आहे, जो देशातील प्रमुख जीवन विमा कंपन्यांमध्ये सर्वाधिक मानला जातो. महत्त्वाचे म्हणजे, नॉन-इन्व्हेस्टिगेटेड क्लेम्ससाठी कंपनीचा सरासरी क्लेम सेटलमेंट टर्नअराउंड वेळ केवळ 1.1 दिवस होता. या कालावधीत कंपनीने सेटल केलेल्या मृत्यू दाव्यांची एकूण रक्कम ₹893.38 कोटी इतकी होती.
ICICI प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्सचे चीफ ऑपरेशन्स ऑफिसर अमिश बँकर म्हणाले,“आमची क्लेम सेटलमेंट प्रक्रिया ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी डिझाइन केली आहे आणि प्रत्येक दाव्याची हाताळणी आम्ही अत्यंत संवेदनशीलतेने करतो.
H1-FY2026 मध्ये आमचा क्लेम सेटलमेंट रेशो 99.33% इतका होता आणि नॉन-इन्व्हेस्टिगेटेड क्लेम्ससाठी सरासरी टर्नअराउंड वेळ फक्त 1.1 दिवस होती. याशिवाय, याच काळात आम्ही ₹893.38 कोटींचे मृत्यू दावे सेटल केले,” असे त्यांनी सांगितले.
“आमचा ग्राहक-प्रथम दृष्टिकोन आणि डिजिटलायझेशनवर असलेला ठाम भर आम्हाला जलद क्लेम सेटलमेंट करण्यास सक्षम करतो, ज्यामुळे कुटुंबांना सर्वात कठीण वेळी वेळेवर आर्थिक मदत मिळते. मोबाईल अॅप, WhatsApp, चॅटबॉट आणि वेबसाइटसारख्या सुविधाजनक प्लॅटफॉर्ममुळे दावेदारांना क्लेम नोंदवणे आणि त्याचा स्टेटस पाहणे अधिक सोपे झाले आहे.
लक्षणीय म्हणजे, आमच्या ‘क्लेम फॉर शुअर’ या उपक्रमांतर्गत — ज्यात सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर पात्र दावे एकाच दिवशी सेटल करण्याची हमी दिली जाते — H1-FY2026 मध्ये आम्ही ₹157.25 कोटींचे मृत्यू दावे सेटल केले आहेत. तसेच, आमचा मागील तिमाहीतही उद्योगातील सर्वाधिक क्लेम सेटलमेंट रेशो कायम राहिला — Q1-FY2026 मध्ये तो 99.60% होता.”
__________________________________________________________________________________________


