Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedआशियातील सर्वात मोठे डायलिसीस सेवा पुरवठादार नेफ्रोप्लस 10 डिसेंबर 2025 रोजी...

आशियातील सर्वात मोठे डायलिसीस सेवा पुरवठादार नेफ्रोप्लस 10 डिसेंबर 2025 रोजी सादर करणार आयपीओ

हैदराबादस्थित नेफ्रोप्लस ही आशियातील सर्वात मोठी डायलेसिस सेवा पुरवठादार आणि जागतिक स्तरावर पाचवी सर्वात मोठी संस्था (आर्थिक वर्ष 2025 मध्ये करण्यात आलेल्या उपचारांच्या संख्येच्या आधारावर) असून त्यांची प्राथमिक समभाग विक्री म्हणजेच आयपीओ बुधवार 10 डिसेंबर रोजी सबस्क्रीब्शनसाठी खुला होईल आणि शुक्रवार, 12 डिसेंबर रोजी बंद होईल.

 

 

 

इक्विटी शेअर्ससाठी किंमतपट्टा 438 रु. ते 460 रु. इतका निश्चित करण्यात आला आहे. तसेच पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर 41 रु. इतकी सवलत देण्यात आली आहे.

 

 

 

या आयपीओमध्ये 353.4 कोटी रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आणि विक्री करणाऱ्या भागधारकांकडून 1,12,53,102 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल यांचा समावेश आहे.

 

 

 

नेफ्रोप्लसचे उझबेकिस्तान येथील ताश्केंतमध्ये 165 बेडचे डायलेसिस क्लिनिक हे जगातील सर्वात मोठे डायलेसिस क्लिनिक आहे. ते फ्रेश इश्यू मधील निव्वळ उत्पनामधून 129.1 कोटी रु. भारतात नवीन डायलेसिस क्लिनिक्स उघडण्यासाठी भांडवली खर्चासाठी आणि 136 कोटी रु. काही कर्जांची पूर्व-परतफेड किंवा नियोजित परतफेड करण्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे.

 

 

 

2009 मध्ये स्थापन झालेली नेफ्रोप्लस हे भारतातील सर्वात मोठे संघटित डायलेसिस सेवा नेटवर्क आहे. त्यांची संपूर्ण भारतात 288 शहरांमध्ये, 21 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये क्लिनिक्स आहेत. कंपनीकडे एकूण 519 क्लिनिक्सचे जागतिक नेटवर्क असून त्यामध्ये फिलिपाईन्स, उझबेकिस्तान आणि नेपाळ मधील 51 क्लिनिक्सचा समावेश आहे.

 

 

 

ही संस्था हिमोडायलिसिस सेवा पुरविते. त्यामध्ये रुग्णांना सर्वात योग्य आणि सोयीस्कर उपचार पर्याय मिळतील हे सुनिश्चित करत होम हिमोडायलिसिस, हेमोडायाफिल्ट्रेशन, हॉलिडे डायलिसिस, डायलिसिस ऑन कॉल आणि डायलिसिस ऑन व्हिल्स यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

 

 

 

आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतीय डायलेसिस सेवा बाजारपेठेचा आकार 818 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढा होता आणि तो 2029 पर्यंत सुमारे 1,979 दशलक्ष अमेरिकन डॉलर पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments