Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedअवधूत साठे ट्रेडिंग अॅकॅडमी (ASTA) कडून सेबीच्या (SEBI) आदेशात नमूद केलेल्या आरोपांचे...

अवधूत साठे ट्रेडिंग अॅकॅडमी (ASTA) कडून सेबीच्या (SEBI) आदेशात नमूद केलेल्या आरोपांचे ठामपणे खंडन*  

 

 

पुणे,०५ डिसेंब: अवधूत साठे ट्रेडिंग अॅकॅडमी ASTA केवळ एक प्रशिक्षण संस्था (training institution) म्हणून कार्य करते. आमचे कार्यक्रम शैक्षणिक आहेत आणि गुंतवणूकदार व ट्रेडर्समध्ये कौशल्य विकास करणे आणि त्यांना आर्थिक बाजारपेठांमध्ये निर्णय घेण्याचे प्रशिक्षण देणे, हा त्यामागचा उद्देश आहे.

 

आम्ही नियामक अस्पष्टतेचे (regulatory vacuum) बळी आहोत आणि आम्ही ‘रिसर्च अॅनालिस्ट’ किंवा ‘गुंतवणूक सल्लागार’ (Investment Adviser) या श्रेणीत येत नाही. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीने कोणतेही स्टॉक विश्लेषण, शिफारसी, गुंतवणुकीचा सल्ला किंवा संशोधन जारी करत नाही, तसेच कोणतेही व्यवहार (transactions) पूर्ण करत नाही. आमच्या सत्रांमध्ये वापरले जाणारे सर्व संदर्भ आणि उदाहरणे केवळ शैक्षणिक आणि संकल्पनात्मक स्पष्टतेसाठी सादर केली जातात. ते संदर्भाधीन असतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा सल्ला किंवा शिफारस समजू नये.

 

त्यामुळे आमचा असा विश्वास आहे की, आदेशात नमूद केलेले नियम आमच्या उपक्रमांना लागू होत नाहीत. ASTA ने सल्लागार सेवा किंवा रिसर्च अॅनालिस्ट सेवांमधून कधीही कोणताही बेकायदेशीर नफा कमावलेला नाही. सल्लागार किंवा विश्लेषकांपासून वेगळे, केवळ प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या स्पष्ट ओळखीचे आम्ही समर्थन करतो.

 

आम्हाला ‘फिनइन्फ्लुएन्सर’ (FinInfluencer) म्हणून देखील वर्गीकृत केले जाऊ शकत नाही, कारण आम्ही आमच्या यूट्यूब किंवा सोशल मीडिया चॅनेल (जसे की इंस्टाग्राम / टेलिग्राम इ.) मधून कोणतेही आर्थिक उत्पन्न (monetisation) मिळवत नाही.

 

आम्ही आमचे कायदेशीर हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलू. या आदेशाला योग्य त्या मंचवर आव्हान दिले जाईल आणि आमचा कायदेशीर व न्यायालयीन व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments