Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedIMTEX फॉर्मिंग 2026 - आशियातील सर्वात मोठे मेटल फॉर्मिंग टेक्नॉलॉजी प्रदर्शन, जागतिक...

IMTEX फॉर्मिंग 2026 – आशियातील सर्वात मोठे मेटल फॉर्मिंग टेक्नॉलॉजी प्रदर्शन, जागतिक उद्योगातील अग्रणींना बेंगळुरूमध्ये आणणार

मेटल फॉर्मिंग आणि उत्पादन तंत्रज्ञानाशी संबंधित आशियातील सर्वात मोठ्या प्रदर्शनात, 4 प्रदर्शन हॉलमध्ये 20 देशांतील 600 हून अधिक प्रदर्शक, 46,000 चौरस मीटर क्षेत्र व्यापणार्‍या. प्रदर्शन स्थानी सहभागी होतील.

मुंबई, 25 नोव्हेंबर 2025: 21 ते 25 जानेवारी 2026 दरम्यान इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IMTMA) बेंगळुरू आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र (BIEC), बेंगळुरू येथे IMTEX फॉर्मिंग 2026 चे आयोजन करणार आहे. IMTEX फॉर्मिंग 2026 मध्ये एकाच वेळी संचलित खालील कार्यक्रम असतील:

• Tooltech, जे मशीन टूल ॲक्सेसरीज, मेट्रोलॉजी सोल्यूशन्स, कॅड /कॅम टूल्स, टूलिंग सिस्टम आणि टूलिंग उद्योगातील अद्ययावत ट्रेंडवर लक्ष केंद्रित करते.

• डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्री 4.0वेल्डेक्सपोमधील रिअल-टाइम सोल्यूशन्समधील अद्ययावत तंत्रज्ञानाचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वेल्डिंग (IIW-इंडिया) च्या सहकार्याने प्रदर्शन केले जाईल

वेल्डिंग तंत्रज्ञान

• Messe Stuttgartने आयोजित केलेले Moldex India व Fastenex India, अनुक्रमे मोल्डिंग, फास्टनर्स आणि फिक्सिंग तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करतील आणि IMTEX FORMING 2026 च्या बाजूलाच एकत्र प्रदर्शित केले जातील.

IMTEX FORMING 2026 मध्ये खालील कार्यक्रम देखील असतील, उदा:

• 22-23 जानेवारी 2026 रोजी भरवण्यात येणार्‍या मेटल फॉर्मिंग व संलग्न क्षेत्रांतील नावीन्यपूर्ण कल.

श्पचे नवसंशोधन करण्यासाठी फॉर्मिंग तंत्रज्ञान या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र

• i2 अकादमीया स्क्वेअर, त्यांचे संशोधन आणि विकास उपक्रम उद्योगासमोर सादर करण्यासाठी संशोधन संस्थांना एक व्यासपीठ

लाभार्थी

• Engineering च्या तरुण विद्यार्थ्यांमध्ये उत्पादन क्षेत्रातील नवीनतम प्रगतीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी Jagruti-IMTMA युवा कार्यक्रम.

आगामी आवृत्तीत जर्मनी, इटली, जपान आणि तैवानमधील नवीनतम उत्पादन तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे प्रदर्शन करणार्‍या प्रदर्शक गटांचा सहभाग असेल. ऑटोमोटिव्ह आणि ऑटो कंपोनंट, एरोस्पेस आणि संरक्षण, वैद्यकीय उपकरणे, वीज, रेल्वे, बांधकाम उपकरणे, सामान्य आणि अवजड अभियांत्रिकी, भांडवली माल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, व्हाइट आणि ब्राऊन वस्तू आणि इतर अनेक क्षेत्रातील पर्यटकांनी येथे भेट देण्याची अपेक्षा आहे.

 

“आज भारतीय मशीन टूल मार्केटमध्ये मेटल फॉर्मिंगचा वाटा 25% असला तरीही येत्या काही वर्षांत या क्षेत्रात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष 25 मध्ये, मेटल फॉर्मिंग मशीन टूल्सचा खप ₹9,139 कोटी होता, तर उत्पादनाचे मूल्य ₹2,696 कोटी होते. एकंदर, मेटल फॉर्मिंग मशीन टूल्सच्या निर्यातीत वर्षानुवर्षे अंदाजे 6% वाढ झाली आहे. निर्यातीमध्ये, प्रेस मशीन्सनी आघाडी घेतली, त्यानंतर प्रेस ब्रेक्स, बेंडिंग मशीन्स आणि शीअरिंग मशीन्सचा क्रमांक लागतो,” असे IMTMA अध्यक्षा सुश्री मोहिनी केळकर म्हणाल्या.

“लेसर आणि लेसर-आधारित उपयोगांना उद्योग क्षेत्रांमध्ये वाढती स्वीकृती मिळत आहे आणि आम्हाला IMTEX FORMING मध्ये लेसर-आधारित उत्पादकांच्या सहभागात सतत वाढ दिसून आली आहे. प्रदर्शक फायबर लेसर मशीन्स, प्रिसिजन लेव्हलर, पिक-अँड-प्लेस युनिट्स, सर्वो प्रेस, मशीन प्रोडक्शन मॉनिटरिंग सिस्टम्स, वेल्डिंग आणि थ्रीडी प्रिंटिंग सोल्यूशन्स प्रदर्शित करतील. “IMTEX FORMING 2026 मुळे स्वदेशी उत्पादांचे उत्पादन आणि त्यांची निर्यात वाढेल,” असे IMTMA महानिर्देशक आणि सीईओ श्री. जीवक दासगुप्ता म्हणाले.

पाच दिवसांचे हे प्रदर्शन उत्पादन क्षेत्रात डिजिटल परिवर्तन आणि उच्च उत्पादकता उपायांचा अवलंब अधिक वेगवान करण्यासाठी एक अनन्य व्यासपीठ आहे.

IMTMAबद्दल

वर्ष 1946मध्ये प्रस्थापित, इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IMTMA) ही भारतातील मशीन टूल उद्योगासाठी शीर्ष उद्योग संघटना आहे. IMTMAमध्ये, मेटल कटिंग आणि मेटल फॉर्मिंग मशीन, ॲक्सेसरीज, कटिंग टूल्स आणि इतर संबंधित उपकरणे तयार करणारे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील 500 हून अधिक कंपन्यांतील सदस्य आहेत, IMTMA धोरण प्रचार, प्रदर्शने, ज्ञान व्यासपीठे, प्रकाशने, संशोधन अहवाल, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास याद्वारे मशीन टूल उद्योगाच्या वृध्दीत सक्रिय भूमिका बजावते. IMTMA ने प्रदर्शने, परिषदा आणि कॉर्पोरेट कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी बंगळुरू आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र नावाची एक हरित प्रदर्शन सुविधा देखील विकसित केली

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments